Home /News /crime /

भगवान बुद्धांना खूश करण्यासाठी दिला बळी; भिख्खूंनी स्वत:चं डोकं तलवारीने कापलं आणि...

भगवान बुद्धांना खूश करण्यासाठी दिला बळी; भिख्खूंनी स्वत:चं डोकं तलवारीने कापलं आणि...

एका बौद्ध भिख्खूने तलवारीने आपलं डोकं कापून भगवान गौतम बुद्ध यांना चढवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

    बँकाॅक, 21 एप्रिल : थायलँडमध्ये एका बौद्ध भिख्खूने तलवारीने आपलं डोकं कापून भगवान गौतम बुद्ध यांना चढवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या भिख्खूला वाटतं होतं की, पुनर्जन्माच्या माध्यमातून तो उच्च स्तरावरील अध्यात्मिक व्यक्तीच्या रुपात पुन्हा जन्म घेईल. मृत भिख्खूची ओळख 68 वर्षांच्या थम्मकॉर्न वांगप्रे अशी असून स्थानिकांनी सांगितलं की, हे भिख्खू गेल्या पाच वर्षांहून अधिक वेळापासून त्याग करण्याबाबत विविध योजना आखत होते. संगमरवरावर लिहिली होती पूर्ण योजना पोलिसांनी सांगितलं की, 15 एप्रिल रोजी थायलँडच्या उत्तर पूर्वेकडील नोंग बुआ लाम्फू प्रातांतील वाट फु हिन मंदिरामध्ये या भिख्खूच्या मृत्यूची बातमी मिळाली होती. मृत भिख्खूचा भाचा बूनचर्ड बूनरोड यांनी मृतदेहाचा तपास केला आणि सांगितंल की, त्याच्या काकांनी एका संगमरवरी स्लॅबवर आपल्या संपूर्ण योजना लिहिल्या आहेत. संगमरवरावर थम्मकॉर्न वांगप्रे यांनी लिहिलं होतं की, आपलं डोकं कापणं हे बुद्धाला खूश करण्याची पद्धत आहे. हे ही वाचा-रुग्णाचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबाचा नकार,मुस्लीम मुलांने केले अंत्यसंस्कार पाच वर्षांपासून तयार करीत होते याची योजना थम्मकॉर्न वांगप्रेचं वाटतं होतं ती, देवाला अर्पण केल्याने त्यांचं जीवनास सौभाग्य प्रात्प होईल. या विश्वासाला बौद्ध धर्मात मेकिंग मॅरिट्सच्या नावाने ओळखलं जातं. हे बौद्ध भिख्खू गेल्या पाच वर्षांपासून याची योजना करीत होते. त्यांच्या भाच्याने सांगितलं की, आपलं डोकं आणि आत्मा बुद्धाला अपर्ण करावे अशी त्यांची इच्छा होती. ज्यामुळे पुढील जन्मी बुद्ध त्यांना उच्च अध्यात्मिक होण्याबरोबरच पुनर्जन्मासाठी मदत करतील. बुद्धांच्या मूर्तीसमोर दिला बळी या भिख्खूंनी बुद्धांच्या मूर्तीच्या अगदी समोर एका धारदार तलवारीने आपलं डोकं कापलं. ही तलवार अशा ठिकाणी लावण्यात आली होती, ज्यात कापलेलं डोकं थेट बुद्धाच्या पायाशी जाऊन पडेल. या मंदिरात 11 वर्षांपर्यंत सेवा करणाऱ्या भिख्खूंनी कधीही आपल्यासोबत असलेल्या पुजाऱ्यांना या तलवारीबद्दल काहीच सांगितलं नव्हतं. ते म्हणायचे की मी भिख्खू पद सोडून देईन, मात्र तलवारीबद्दल काहीच सांगणार नाही. पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी पाठवला मृतदेह मृत्यू झाल्याची सूचना मिळाल्यानंतर पोलिसांनी भिख्खूचे शव आपल्या ताब्यात घेतले आहे आणि पोस्टमार्टमसाठी पाठवलं आहे. भिख्खूच्या मृत्यूनंतर 300 हून अधिक स्थानिक भक्त त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. भिख्खूचे शव एका ताबुत ठेवण्यात आलं होतं. तर त्याचं डोक त्यांचे अनुयायी आणि कुटुंवातील सदस्यांसमोर एका जारमध्ये ठेवण्यात आलं होतं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Thailand

    पुढील बातम्या