जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; माफीचा साक्षीदार होण्याची सचिन वाझेंची तयारी, ईडीला पाठवलं पत्र

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; माफीचा साक्षीदार होण्याची सचिन वाझेंची तयारी, ईडीला पाठवलं पत्र

अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; माफीचा साक्षीदार होण्याची सचिन वाझेंची तयारी, ईडीला पाठवलं पत्र

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, या प्रकरणातील आरोपी सचिन वाझे याने माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 फेब्रुवारी : मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी ईडीला (ED) एक पत्र लिहून माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवली आहे. ईडीच्या सहाय्यक संचालकांना सचिन वाझेंनी पत्र पाठवलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या प्रकरणात सचिन वाझे आरोपी आहे. या प्रकरणात आपल्याला माफीचा साक्षीदार करावं अशी विनंती करणारं पत्र सचिन वाझेंनी ईडीला पाठवलं आहे. त्यामुळे आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ईडीच्या सहाय्यक संचालकांना पाठवलेल्या पत्रात सचिन वाझे यांनी म्हटले आहे की, “मी सक्षम न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर वरील प्रकरणाच्या संदर्भातील मला ज्ञात असलेल्या सर्व सत्य आणि ऐच्छिक माहिती देण्यास तयार आहे. त्यानुसार मला माफी देण्यासाठी या अर्जावर निर्णय घ्यावा ही विनंती करतो.” वाचा :  सीताराम कुटेंचा ईडीसमोर गौप्यस्फोट, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार? आपल्या पत्रात सचिन वाझेंनी पुढे म्हटलं, “मी तुम्हाला विनंती करतो की, सीआरपीसीच्या कलम 306, 307 अंतर्गत मला माफी देण्याच्या या अर्जावर कृपया विचार करावा.” सीआरपीसीचे कलम 306 आणि 3007 गुन्ह्यात साथीदाराला क्षमा देण्याच्या न्यायालयाच्या अधिकारांशी संबंधित आहेत.

जाहिरात

अनिल देशमुखांच्या सूचनेनंतर पैसे दिले मिळालेल्या माहितीनुसार, सचिन वाझे यांनी बुधवारी चौकशी आयोगाला सांगितले की त्यांनी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सहय्यकांना त्यांच्या सूचनेनुसार पैसे दिले होते. वाचा :  परमबीर सिंगांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर आरोप, शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया सीताराम कुंटेंचा ईडीसमोर गौप्यस्फोट राज्यातील पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भात लॉबिंग आणि भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीत गैरव्यवहार होत असल्याचा आरोप होत होता. या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीतील गैरव्यवहार झाल्याच्या संदर्भात तत्कालीन एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांनी जुलै 2020 मध्ये एक अहवाल तयार केला होता. त्या प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हा अहवाल दिला होता. या अहवालानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 28 सप्टेंबर रोजी डीजीपी सुबोध जैसवाल यांना एक पत्र पाठवले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या या पत्रावर डीजीपी सुबोध जैसवाल यांनी उत्तरच दिलं नाही असा जबाब सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात