Home /News /mumbai /

मोठी बातमी : सीताराम कुटेंचा ईडीसमोर गौप्यस्फोट, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?

मोठी बातमी : सीताराम कुटेंचा ईडीसमोर गौप्यस्फोट, अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार?

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आता आणखी अडचणीत येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर दिलेल्या जबाबात केलेल्या गौप्यस्फोटामुळे आता अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार आहेत.

    मुंबई, 29 जानेवारी : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी लेटर बॉम्ब टाकत 100 कोटींच्या वसुलीबाबत गौप्यस्फोट केला. त्यानंतर या प्रकरणात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh former Home Minister of Maharashtra)  यांनाही आपल्या पदावरुन पायउतार व्हाव लागलं. त्याच दरम्यान आता राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी दिलेल्या माहितीमुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या संदर्भात ईडीच्या अधिकाऱ्यांनी अनेक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचाही जबाब नोंदवण्यात आला आहे. राज्याचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर एक मोठा आणि धक्कादायक गौप्यस्फोट केला असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सीताराम कुंटे यांनी ईडीसमोर दिलेल्या जबाबानुसार, सीताराम कुंटे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटलं की अनिल देशमुख गृहमंत्री असताना मला पोलिसांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे. मी त्यांच्या अधीन काम करत होतो आणि त्यामुळे त्या याद्या स्वीकारायला मी नकार देऊ शकत नव्हतो. वाचा : मुंबई महापालिका 2022 निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचा आराखडा तयार, हरकती आणि सुनावणींचा कार्यक्रम जाहीर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताराम कुंटे यांच्या जबाबामुळे एकच खळबळ उडाली आहे. आता सीताराम कुंटे यांनी केलेल्या या गौप्यस्फोटमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचं बोललं जात आहे. अनिल देशमुख यांच्या अधीन काम करत असल्याने मी वरिष्ठांचे आदेश समजून त्यांनी पाठवलेल्या यादीवर स्वाक्षरी करत होतो. सीताराम कुंटे गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात मुख्य सचिव पदावरुन निवृत्त झाले. यानंतर त्यांची मुख्यमंत्री सचिवालयात प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. इतकेच नाही तर सीताराम कुंटे हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असल्याचं बोललं जातं. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनीही अनिल देशमुख यांच्यावर बदली, पोस्टिंगमध्ये हस्तक्षेप करण्याचा आरोप केला होता. परमबीर सिंग यांनी म्हटलं होतं की, जुलै 2020 मध्ये मुंबईतील 10 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले होते. त्यासाठी दोन दिवसांत त्यांना तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचा व्हॉट्सअप मेसेज आला होता. डिसेंबर महिन्यात कुंटेंची 6 तास चौकशी ईडी अधिकाऱ्यांनी तब्बल 6 तास सीताराम कुंटे यांची डिसेंबर महिन्यात चौकशी केली होती. ईडीच्या मुंबई येथील कार्यालयात सीताराम कुंटे यांचा जबाब नोंदविण्याचं काम तब्बल 6 तास सुरु होतं. अनिल देशमुख यांच्यावर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत आरोप करण्यात आला होता. देशमुख गृहमंत्री असताना पोलिसांच्या बदल्या करताना मनी लॉन्ड्रिंग झाली का? या विषयी कुंटे यांची चौकशी करण्यात आली. अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री असताना सीताराम कुंटे हे गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळेल, अशी ईडीला आशा होती.

    तुमच्या शहरातून (मुंबई)

    Published by:Sunil Desale
    First published:

    पुढील बातम्या