मुक्या जीवाला अमानुष मारहाण; निर्दयी युवकाने कुत्र्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने केला वार

मुक्या जीवाला अमानुष मारहाण; निर्दयी युवकाने कुत्र्याच्या डोक्यात लोखंडी रॉडने केला वार

एका तरुणाने (Young Man) कुत्र्याच्या पिल्लाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार (Stabbed Puppy with iron rod) केल्याची अमानुष घटना समोर आली आहे. आरोपी युवकाने काहीही कारण नसताना या मुक्या प्राण्याला मारहाण केली आहे.

  • Share this:

पाटणा, 27 मार्च: एका तरुणाने (Young Man) कुत्र्याच्या पिल्लाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार (Stabbed Puppy with iron rod) केल्याची अमानुष घटना समोर आली आहे. आरोपी युवकाने काहीही कारण नसताना या मुक्या प्राण्याला मारहाण केली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपी युवकाला अटक (Accused arrest by police) केली आहे. त्याच्या विरोधात अॅनिमल प्रोटेक्शन कायद्यांतर्गत (Animal protection act) गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित युवक बिहारची राजधानी पाटणाच्या पत्रकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोगीपूर परिसरात राहतो. त्याने परिसरातील एका कुत्र्याच्या पिल्लावर लोखंडी रॉडने (Attack with iron rod) हल्ला केला आहे. या हल्ल्यात संबंधित कुत्र्याचं पिल्लू गंभीर जखमी झालं आहे. तसेच त्याच्या डोक्याचं हाडंही मोडलं आहे. या निर्दयी हल्ल्यानंतर जखमी कुत्रं रस्त्यावर विव्हळत पडलं होतं. तेव्हा एका सामाजिक कार्यकर्त्याने हा प्रकार लक्षात येताच या घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. त्यांनी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होतं कुत्र्याच्या पिल्लाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.

हे वाचा - बंगालमध्ये मतदानादिवशीच आढळला भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह, हत्या झाल्याचा आरोप

तसेच प्रथमदर्शिनी आणि काही स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी संबंधित कुत्र्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी युवकाच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 429 आणि इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुत्र्याच्या पिल्लाला रुग्णालयात दाखल केलं असता, कुत्र्याचं एक्स रे काढला. त्यानंतर सर्व पोलीस सुन्न झाले, कुत्र्याच्या डोक्याचं हाडं मोडलं असल्याचं एक्स रे मधून निष्पन्न झालं आहे.

Published by: News18 Desk
First published: March 27, 2021, 2:48 PM IST

ताज्या बातम्या