मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

एक मॅसेज अन् पुनावालांच्या सिरम इन्स्टिट्युटला 1 कोटींचा गंडा! भामट्यांनी असा साधला डाव

एक मॅसेज अन् पुनावालांच्या सिरम इन्स्टिट्युटला 1 कोटींचा गंडा! भामट्यांनी असा साधला डाव

एक मॅसेज अन् पुनावालांच्या सिरम इन्स्टिट्युटला 1 कोटींचा गंडा! भामट्यांनी असा साधला डाव

एक मॅसेज अन् पुनावालांच्या सिरम इन्स्टिट्युटला 1 कोटींचा गंडा! भामट्यांनी असा साधला डाव

सिरम इन्स्टिट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांच्या नावाने बनावट व्हॉटसअ‍ॅप मेसेज पाठवून सिरम इन्स्टिट्युटला तब्बल 1 कोटी रुपयांना गंडा घालण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

चंद्रकांत फुंदे, पुणे

पुणे, 12 सप्टेंबर : कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करणाऱ्या अदार पूनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटची (SII) तब्बल एक कोटी रुपयांना चुना लावला आहे. यासाठी गुन्हेगारांनी सोशल मीडियाचा वापर केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सिरम इन्स्टिट्युटचे फायनान्स अधिकारी सागर कित्तुर यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार इतका घातक आहे, की सोशल मीडिया वापरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत घडू शकतो. अशी घटना तुमच्यासोबत घडू नये यासाठी काय काळजी घ्यावी? चला समजून घेऊ.

थेट सिरम इनस्टिट्यूटच्या डायरेक्टरलाच घातला गंडा

अख्ख्या जगाला कोरोना लस पुरवणाऱ्या सिरम इंस्टीटयूटलाच एका सायबर भामट्याने तब्बल 1 कोटींचा गंडा घातला आहे. गेल्या 8 सप्टेंबर रोजी सिरम इनस्टिट्यूटचे संचालक सतीश देशपांडे यांच्या मोबाईलवर अदर पुनावाला यांच्या नावाने एक व्हॉट्सअप मेसेज धडकला. त्यात काही बँक खात्यांचे नंबर देऊन त्यावर तात्काळ पैसे पाठविण्यास सांगितले. व्हॉट्सअप डीपीवरून देशपांडे यांना हे मेसेज खरे वाटल्याने त्यांनीही लागलीच कंपनीच्या फायनान्स ऑफिसरला कंपनी खात्यावरुन विविध बँक खात्यावर एकूण 1 कोटी 1 लाख 1 हजार 554 रुपये ट्रान्सफर केले. पण नंतर दुसऱ्या दिवशी अदर पुनावाला यांना याबाबत देशपांडेनी माहिती दिली असता त्यांनी मी असा कोणताही मेसेज केला नसल्याचा खुलासा केला आणि तिथेच आपल्या कंपनीला कुणीतरी भामट्याने तब्बल 1 कोटींची टोपी घातल्याचं लक्षात आलं. म्हणूनच सिरम इनस्टिट्यूटने तात्काळ पोलिसात धाव घेतली.

वाचा - हत्या प्रकरणातील एकमेव प्रत्यक्षदर्शीचा मृत्यू! आरोपीबाबत कोर्टाचा मोठा निर्णय

पोलिसांनी तात्काळ पैसै ट्रांसफर झालेली बँक खाती ट्रेस करून 17 लाखांची रक्कम फ्रिजही केलीय. ही सर्व बँक खाती बिहार, कोलकत्ता, आसामची असल्याचं पोलीस तपासात समोर आलं. पण, या सायबर भामट्याने सिरम इनस्टिट्यूटला नेमकं फसवलं तरी कसं?

निव्वळ चिटिंगची केस

या फ्रॉडकेसमध्ये तसं पाहिलं तर कुठंच कार्ड क्लोनिंग किंवा ऑनलाईन अफरातफर झाल्याचं दिसत नाही तर ही निव्वळ चिटिंगची केस आहे. मग संचालक पदावरच्या व्यक्तीने एका अनोळखी नंबर वरून आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवलाच तरी कसा?  क्रॉसचेकिंग शिवाय लागलीच 1 कोटी ट्रांसफर केलेच तरी कसे, असा साधा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. अर्थात पोलीस तपासात अंतिम सत्य समोर येईलच.

First published:

Tags: Crime, Cyber crime