मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /सख्ख्या भावानेच केली बहिणीच्या घरी लाखोंची चोरी, भाचीच्या लग्नासाठीचे दागिने लांबवले

सख्ख्या भावानेच केली बहिणीच्या घरी लाखोंची चोरी, भाचीच्या लग्नासाठीचे दागिने लांबवले

पैसे आणि दागिने बघितल्यानंतर अनेकांची नियत बिघडते.

पैसे आणि दागिने बघितल्यानंतर अनेकांची नियत बिघडते.

पैसे आणि दागिने बघितल्यानंतर अनेकांची नियत बिघडते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

विजय देसाई, प्रतिनिधी

मुंबई, 7 नोव्हेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चोरीच्या घटनाही सातत्याने समोर येत आहे. अशातच येत धक्कादायक बातमी समोर आली आहे. सख्ख्या भावानेच बहिणीचे घरात चोरी करत लाखो रुपयांचे दागिने चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी चोरट्या भावाला गुजरातमधून अटक करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

मिरा रोडमध्ये लग्नकार्य असलेल्या ठिकाणी अचानक लाखो रुपये आणि दागिने चोरी झाल्याचे घटना घडली होती. आपल्या भाचीच्या लग्नासाठी केलेले दागिने आणि रोख रक्कम घेऊन पसार झाला होता. यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या तीन पथकाने महिलेच्या सख्ख्या भावाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून लाखो रुपये आणि दागिन्यांसह मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

पैसे आणि दागिने बघितल्यानंतर अनेकांची नियत बिघडते. अशाच या धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. मीरा रोडमध्ये सख्ख्या भावानेच आपल्या भाचीच्या लग्नाचे पैसे आणि दागिने लुटून मामाच्या नात्याला कलंक फासला आहे. त्याने चोरी केलेले दागिने आणि रोकडची किंमत एकूण 26 लाख 60 हजार आहे. या घटनेची परिसरात जोरदार चर्चा होत आहे.

हेही वाचा - सिरिअल बनवण्याच्या बहाण्याने अश्लील फिल्म शूट, शहापूरमधील प्रकाराने खळबळ

पुण्यात तरुणाचा खून -

पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तळेगावमध्ये 10 ते 15 जणांच्या टोळक्याने महाविद्यालयीन तरुणाचा खून केला आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. काल रात्री ही धक्कादायक घटणा घडली आहे. हा वीस वर्षीय तरुण इंद्रायणी महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादाचे पडसाद काल उमटले. वाढदिवसाच्या पार्टीसाठी जातो असं सांगून प्रणव घरातून बाहेर पडला होता.

हत्येपूर्वी प्रणव मित्रांसमवेत एका कट्ट्यावर बसले होते. तेंव्हा वीस जणांचा टोळका त्यांच्या दिशेने आला. काहींच्या हातात कोयता असल्याचे पाहून प्रणव आणि त्याचे मित्र जीव वाचवण्यासाठी धावू लागले. या टोळक्याने त्यांचा पाठलाग करून हल्ला केला. यात प्रणवचा जागीच मृत्यू झाला.

First published:
top videos

    Tags: Crime news, Police