नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : दिल्ली विद्यापीठाचे (Delhi University) निवृत्त प्रोफेसर दाम्पत्याने (Couple) आत्महत्या (suicide) केल्याचं वृत्त समोर आलं आहे. ते दिल्लीतील गोमती अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृतदेहाजवळ सुसाइड नोट (Suicide Note) मिळाली आहे. यात त्यांनी आत्महत्या करण्यामागील कारण सांगितलं आहे.
या दाम्पत्याचं नाव राकेश कुमार जैन आणि उषा जैन असल्याचं सांगितलं जात आहे. ते दिल्लीतील गोमती अपार्टमेंटमध्ये राहत होते. त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. राकेश यांचं वय ७४ तर पत्नीचं वय ६९ होतं. दोघेही दिल्ली विद्यापीठात प्रोफेसर होते. एका रस्ते अपघातात दोघांना मल्टीपल फ्रॅक्चर झालं होतं. यानंतर दोघांना त्रास होऊ लागला. ते अंथरूणाला खिळून होते.
बुधवारी दाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या जवळ एक सुसाइड नोट सापडली आहे. यात त्यांनी सुसाइडचं कारण सांगितलं. सुसाइड नोटमध्ये त्यांनी लिहिलं होतं की, रस्ते अपघातात त्यांना मल्टिपल फ्रॅक्चर झालं होतं. यानंतर त्याचं जीवन अवघड झालं होतं. ते आपल्या जीवनाला कंटाळले होते. यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला.
हे ही वाचा-दारू पार्टीमध्येच मित्राचा केला खून; अवघ्या 10 रुपयांमुळे सुरू झाला वाद आणि...
दोघे दिल्लीतील गोमती अपार्टमेंट राहत होते. या घटनेनंतर जवळपासच्या लोकांना धक्काच बसला आहे. ही दोघेही आता आपल्यात नाही यावर त्यांचा विश्वासच बसत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.