मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

HDFC बँकेच्या ATM मधून निघाली 100 रुपयांची खोटी नोट, ग्राहकही हैराण

HDFC बँकेच्या ATM मधून निघाली 100 रुपयांची खोटी नोट, ग्राहकही हैराण

खोटी नोट तरुणाच्या लक्षात आल्यामुळे मोठी बाब उघड झाली.

खोटी नोट तरुणाच्या लक्षात आल्यामुळे मोठी बाब उघड झाली.

खोटी नोट तरुणाच्या लक्षात आल्यामुळे मोठी बाब उघड झाली.

खेड, 10 नोव्हेंबर : रत्नागिरी (Ratnagiri News) जिल्ह्यातल्या खेडमधील एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank ATM) एटीएममधून चक्क 100 रुपयांची खोटी नोट मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. रोनित इनरकर या तरुणाने खेडमधील एचडीएफसी बँकेच्या एटीएम मधून 10 हजार रुपये काढले. त्यावेळी 500 रुपयांच्या 19 नोटा आणि शंभर रुपयांच्या 5 नोटा मशीनमधून आल्या. (Ratnagiri fake note withdrawn from HDFC Bank ATM )

त्याच ठिकाणी पैसे मोजत असताना त्या तरुणाला संशय आला म्हणून त्याने शेजारी असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शाखेत जाऊन तक्रार केली. पहिल्यांदा त्या तरुणाला उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. म्हणून त्या तरुणाने खेड पोलीस ठाण्यात याबद्दल माहिती सांगितली. रिजर्व बँकेच्या नियमाप्रमाणे त्या तरुणाची तक्रार घेण्यात आली आहे.

खेड आणि परिसरात खोट्या चलनी नोटा मोठ्या प्रमाणात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. मात्र आता एटीएम मशीन मधूनच खोटी नोट आल्याने याबाबतचा सखोल तपास होणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ही घटना आज बुधवार 10 नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास घडली.

रोनित इनरकर या तरुणाने एटीएम मशीनमधून आलेली 100 रुपयांची नोट संशयास्पद असल्याची माहिती शेजारीच असलेल्या  एचडीएफसी बँकेच्या शाखा अधिकारी श्री चव्हाण यांना दिली. सुरवातीला त्यांनी इनरकर याला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र इनरकर यांनी पोलिसांची मदत घेतली. हा विषय 100 रुपयांच्या खोट्या नोटेचा नसून अनेकांच्या फसवणुकीचा आहे, म्हणून खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी शशीकिरण काशीद यांनी तत्काळ खेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांना बोलावून घेत या प्रकरणाबाबत माहिती घेण्यास सांगितली.

हे ही वाचा-रिक्षा चालकासोबत पळाली करोडपतीची बायको; पैसे संपताच घरी आली अन्...

रोनित इनरकर या तरुणाच्या एटीएम मशीनमधून हातात असलेली १०० रुपयांची नोट खोटीच असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी देखील कबुल केल्यानंतर रिजर्व बँकेच्या नियमाप्रमाणे बँकेला रीतसर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगण्यात आले. इनरकर या तरुणाने रीतसर बँकेत तक्रार दिली. त्यानुसार बँकेने आरबीआयच्या नमूद तख्त्यानुसार पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची प्रक्रिया सुरु केली. दरम्यान गेल्या महिनाभरापासून खेड आणि परिसरात खोट्या नोटांचा विषय नाक्यानाक्यावर चर्चिला जात आहे. आता थेट बँकेच्या एटीएम मशीनमधून खोटी नोट आल्याने चिंतेचा विषय ठरला आहे.

First published:

Tags: Hdfc bank