• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • प्रॅक्टिकलची वही देण्याच्या बहाण्यानं बोलावलं, 2 अल्पवयीन मुलींवर केला बलात्कार

प्रॅक्टिकलची वही देण्याच्या बहाण्यानं बोलावलं, 2 अल्पवयीन मुलींवर केला बलात्कार

शाळेतील प्रॅक्टिकलचे (Rape with two minor girls shocks everyone) नोट्स देण्याच्या बहाण्यानं दोन अल्पवयीन मुलीना घरी बोलावून त्यांच्यावर (Called girls to collect notes of practical) दोघांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीला आली आहे.

 • Share this:
  पटना, 15 नोव्हेंबर: शाळेतील प्रॅक्टिकलचे (Rape with two minor girls shocks everyone) नोट्स देण्याच्या बहाण्यानं दोन अल्पवयीन मुलीना घरी बोलावून त्यांच्यावर (Called girls to collect notes of practical) दोघांनी बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीला आली आहे. मुलींच्या वर्गात असलेल्या एका मुलाला पाठवून या नराधमांनी मुलींना प्रॅक्टिकलची वही देण्याचं आश्वासन दिलं. त्यानंतर या मुली त्यांच्या घरी आल्या. त्यावेळी दरवाजा बंद करत दोघांनी त्यांच्यावर अत्याचार केले. अशी घडली घटना बिहारमधील अकबरपूर परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याचं स्पष्ट झालं आहे. मोहम्मद रियान नावाचा अल्पवयीन तरुण या तरुणींच्या घराजवळच राहत होता. त्याने या दोघींना भेटून प्रॅक्टिकलच्या नोट्स असल्याचा निरोप दिला आणि मित्राच्या घरी येऊन त्या घेऊन जायला सांगितलं. त्यानंतर त्या नोट्स घेण्यासाठी दोन्ही तरुणी दिलेल्या पत्त्यावर पोहोचल्या. दोघींवर अत्याचार दोघीही घरात पोहोचताच बाहेरून दार लावून दोन तरुणांनी त्या दोघींवर बलात्कार केला. या घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीदेखील दिली. त्यानंतर भांबावलेल्या अवस्थेत घरी आलेल्या मुलींनी पोलिसांत तक्रार दाखल केली. या अमानवी घटनेमुळे दोन्ही मुलींना जबर धक्का बसला आहे. पोलीस तपास सुरू पोलिसांनी दोघांविरुद्ध बलात्काराचा आणि तिसऱ्या तरुणाविरुद्ध दोघांना साथ दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तिघांपेकी दोघांना अटक करण्यात आली असून तिसरा आरोपी फरार झाला आहे. लवकरच तिसऱ्या आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात येईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. हे वाचा - बँक कर्मचाऱ्यांनीच ग्राहकांच्या खात्यातून उडवले तब्बल 9 कोटी; असा झाला खुलासा! गावात संताप या घटनेमुळे गावातील सर्वांनाच धक्का बसला असून आरोपी तरुणांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. काही तरुणांच्या दुष्कृत्यामुळे पूर्ण गाव बदनाम होत असून अशा विकृतींना वेळीच धडा शिकवण्याची गरज असल्याचं मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.
  Published by:desk news
  First published: