मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

बँक कर्मचाऱ्यांनीच ग्राहकांच्या खात्यातून उडवले तब्बल 9 कोटी; असा झाला खुलासा!

बँक कर्मचाऱ्यांनीच ग्राहकांच्या खात्यातून उडवले तब्बल 9 कोटी; असा झाला खुलासा!

पैसे सुरक्षित राहावेत यासाठी जिथं पैसे ठेवले जातात, तेथील लोक जर त्यावर डल्ला मारू लागले तर...

पैसे सुरक्षित राहावेत यासाठी जिथं पैसे ठेवले जातात, तेथील लोक जर त्यावर डल्ला मारू लागले तर...

पैसे सुरक्षित राहावेत यासाठी जिथं पैसे ठेवले जातात, तेथील लोक जर त्यावर डल्ला मारू लागले तर...

    नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : ब्रिटेनमधील दोन बँक कर्मचारी (Bank employees) ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेराल्ड फ्रांसिस सरपोंग आणि मोहम्मद महबूब उद्दीन अशी या दोन आरोपींची नावे आहेत. या दोघांनी ग्राहकांच्या खात्यातून तब्बल 9 कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा धक्कादायक (Shocking News) प्रकार समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ग्राहकांच्या खात्याची माहिती घेऊ त्यांनी ग्राहकांना कोटी रुपयांचा चुना लावला होता. हा प्रकार उघड झाल्यानंतर दोघांना शिक्षा सुनावण्यात आली असून त्यांची रवानही तुरुंगात करण्यात आली आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण... मिरर युकेमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, बँकेत डेस्कचा तपास घेतल्यानंतर गेराल्ड आणि मोहम्मदला 9,00,000 पाऊंड (8 कोटी 99 लाख रुपये) फसवणूक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांनी 2018 मध्ये फ्रॉड केला होता. गेराल्डला त्याच वर्षी जुलै महिन्यात अटक करण्यात आली होती. अधिकाऱ्यांना बर्मिंघममध्ये त्याच्या डेस्कच्या तपासादरम्यान डिजिटल उपकरण सापडली होती. त्याने आपल्या मोबाइलमधून ग्राहकाच्या खात्याचे डिटेल मोहम्मला पाठवली होती. हे ही वाचा-दिराचं वहिनीसोबत घृणास्पद कृत्य; अश्लील व्हिडीओ, ब्लॅकमेल, सेक्स आणि... यानंतर पोलिसांनी सर्च वॉरंट मिळवल्यानंतर आणि डिजिटल उपकरण, दस्तावेज जप्त केल्यानंतर 17 जुलै 2018 मध्ये लंडनच्या बेथनम ग्रीनने मोहम्मदला त्याच्या घरातून अटक करण्यात आली होती. बँकेनेच हा फ्रॉड बाहेर काढला होता. बऱ्याच दिवसांपासून याचा तपास सुरू होता. शेवटी 5 नोव्हेंबर 2021 गेराल्डला पाच वर्षे आणि मोहम्मदला 6 वर्षांचा कारावासाशी शिक्षा सुनावण्यात आली. याशिवाय कोर्टाने ग्राहकाला झालेल्या नुकसानाचे पैसे परत करण्याचा आदेश दिला आहे. पोलिसांनी सांगितलं की, दोघे एक-दुसऱ्याला ग्राहकाच्या खात्याची माहिती पाठविण्यासाठी मोबाइल फोनचा वापर करीत होते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bank, Crime news

    पुढील बातम्या