मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /संतापजनक! बलात्कार पीडित तरुणीला नातेवाईकांकडून बेदम मारहाण; आरोपीसोबत काढली धिंड

संतापजनक! बलात्कार पीडित तरुणीला नातेवाईकांकडून बेदम मारहाण; आरोपीसोबत काढली धिंड

एका बलात्कार पीडित तरुणीला तिच्याच नातेवाईकांनी बेदम मारहाण ( Rape victim beaten to death) करून तिची बलत्काराच्या आरोपीसोबत धिंड (procession with rape accused) काढली आहे.

एका बलात्कार पीडित तरुणीला तिच्याच नातेवाईकांनी बेदम मारहाण ( Rape victim beaten to death) करून तिची बलत्काराच्या आरोपीसोबत धिंड (procession with rape accused) काढली आहे.

एका बलात्कार पीडित तरुणीला तिच्याच नातेवाईकांनी बेदम मारहाण ( Rape victim beaten to death) करून तिची बलत्काराच्या आरोपीसोबत धिंड (procession with rape accused) काढली आहे.

अलीराजपूर, 29 मार्च: एका बलात्कार पीडित तरुणीला तिच्याच नातेवाईकांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. संबंधित नातेवाईकांनी बलात्कार पीडित तरुणीला बेदम मारहाण ( Rape victim beaten to death) करून तिची बलत्काराच्या आरोपीसोबत धिंड (procession with rape accused) काढली आहे. या घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेतली असून आरोपी आणि पीडित युवतीच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी 6 आरोपींना अटक केली असून घटनेचा तपास केला जात आहे.

संबंधित घटना मध्य प्रदेशातील अलीराजपूर येथील आहे. येथील एका कुटुंबाने बलात्कार पीडित आपल्या मुलीला आधार देण्याऐवजी तिच्यासोबत क्रूरतेच्या सर्व परिसीमा गाठल्या आहेत. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला आणि पीडितेला दोरखंडाने बांधून बेदम मारहाण केली आहे. एवढंच नव्हे तर पीडित मुलीची आरोपीसोबत धिंड देखील काढली आहे. संबंधित आरोपी हा पीडित मुलीच्या परिचयाचा असून तिच्या नात्यातील आहे. या मारहाणीच्या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी पीडितेच्या सांगण्यावरून दोन FIR दाखल केले आहेत. पहिला FIR आरोपी विरुद्ध दाखल केला असून त्याच्यावर बलात्कारासोबतच पोक्सो अंतर्गत विविध कलमं लावण्यात आली आहेत. तर दुसऱ्या FIR मध्ये पीडितेनं आपल्या नातेवाईकांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. यामध्ये पीडितेला मारहाण, डांबून ठेवणे, अपमानजनक वागणूक देणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न आदी गुन्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोन्ही गुन्ह्यात नमूद केलेल्या सर्व आरोपींना अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

हे ही वाचा- अनैतिक संबंधातून गर्भवती महिलेचा बेदम मारहाणीत मृत्यू; लिव्ह इन पार्टनरला अटक

आरोपी तरुणाला पीडित आधीपासून ओळखते

या घटनेबाबत सांगताना SP विजय भागवानी यांनी सांगितलं की, आरोपी तरुण हा विवाहित असून पीडित मुलगी आरोपीला आधीपासून ओळखत होती. पीडित मुलीची गुजरातमध्ये असताना आरोपी मुलाशी ओळख झाली होती. त्यानंतर दोघंही आपापल्या गावी परतले होते.  दरम्यान पीडितेच्या नातेवाईकांनी आरोपीला आणि पीडित मुलीला पकडून त्यांना बेदम मारहाण केली आहे. पोलिसांनी सध्या आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास केला जात आहे.

First published:

Tags: Crime news, Madhya pradesh, Rape