अजहर खान, प्रतिनिधी सिवनी (मध्यप्रदेश), 12 मार्च : देशात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यातच आता सिवनी येथील कुरई आरोग्य केंद्रात तैनात असलेल्या स्टाफ नर्ससोबत बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - बालाघाट जिल्ह्यातील कटंगी येथील रहिवासी असलेली स्टाफ नर्स एकटीच तिच्या घरातून कुरईकडे स्कूटीवर येत होती. त्यानंतर आरोपीने स्टाफ नर्सला वाटेत एका निर्जनस्थळी बळजबरीने थांबवून बलात्कार केला. या घटनेनंतर पीडितेने कुरई पोलीस ठाण्यात येऊन एफआयआर दाखल केला. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. स्टाफ नर्स कुरई येथे तैनात असल्याचे सांगण्यात येत आहे. ही स्टाफ नर्स होळी साजरी करण्यासाठी बालाघाट जिल्ह्यातील कटंगी भागातील तिच्या घरी गेली होती आणि सण साजरा करून एकटीच स्कूटीवर कुरईला परतत होती. यादरम्यान, स्टाफ नर्सच्या गावात राहणाऱ्या रोहित या आरोपी तरुणाने स्टाफ नर्सचा पाठलाग करून तिला जंगलातील निर्जन ठिकाणी बळजबरीने थांबवले आणि ओढत जंगलात नेले. तसेच यावेळी तिला तिला आपल्या वासनेची शिकार बनवत तिच्यावर बलात्कार केला. यावेळी स्टाफ नर्सने आरडाओरड केली. मात्र, दूरदूरपर्यंत कोणीच उपस्थित नव्हते. त्यामुळे पीडितेला मदत मिळाली नाही. I HATE YOU PAPA लिहून 11वीच्या विद्यार्थिनीचं भयानक पाऊल, म्हणाली… बलात्कारानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून पळून गेला होता. दरम्यान, घटनेनंतर पीडितेने कुरई पोलीस ठाणे गाठले. पीडित मुलगी आरोपीला आधीपासूनच ओळखत होती, त्यामुळे पीडितेने आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला. माहिती देताना एसपी रामजी श्रीवास्तव म्हणाले की, प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कुरई पोलिसांनी आरोपींविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. यासह तत्परता दाखवत पोलिसांनी आरोपीला त्याच्या अड्ड्यावरून अटक केली. त्यानंतर पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार, आरोपी तरुणाशी तिच्या कुटुंबाचे जुने वैर आहे. त्यामुळे तरुणाने तिच्यासोबत बलात्काराची घटना घडली आहे. सध्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.