उस्मानाबाद, 30 ऑगस्ट : राज्यात दिवसेंदिवस अत्याचार, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यात आता उस्मानाबादमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात एका 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण तुळजापूर येथील सिंदफळ गावात एका 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार करण्यात आला. इतकेच नव्हे तर बलात्कार करुन नराधमाने मुलीच्या गुप्तागांवर वारही केले. सध्या या अल्पवयीन पीडित मुलीवर तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांनी एका आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पीडित अल्पवयीन लहान मुलगी ही घराच्या पाठीमागे खेळण्यास गेली होती. याच दरम्यान, नराधमाने डाव साधला आणि तिला खेळता खेळता शेजारील शेतात घेऊन गेला. तसेच त्याठिकाणी त्याने पीडित मुलीवर बलात्कार केला. तसेच पीडितेच्या गुप्तांगावरही वा केले. याप्रकरणी तुळजापूर पोलिसात पोस्को कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा - धक्कादायक! अल्पवयीन मुलीची साडेतीन लाखात विक्री, नंतर लग्न लावून मनाविरुद्ध ठेवले शारिरिक संबंध या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. राज्यात बलात्काराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ असल्याचे दिसत आहे. देशात दर तासाला तीन बलात्कार - देशात महिलांबाबतच्या 4.28 लाखांहून अधिक गुन्ह्यांची नोंद 2021 या फक्त एका वर्षात झाली आहे. तर बलात्काराचे 31677 गुन्हे दाखल झाले. यावरुन असे दिसते की, दर तासाला तीन महिलांवर बलात्कार झाले आहेत. बलात्काराच्या प्रयत्नाचे 3800 गुन्हे दाखल झाले. बलात्काराच्या घटनांमध्ये 97% आरोपी हे ओळखीतलेच होते. तर 2,024 प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्यच बलात्कार करणारा होता. देशातील बलात्काराची आकडेवारी ही भयावह आहे, असे यावरुन दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.