ललितपुर, 15 ऑक्टोबर : गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या अल्पवयीन मुलीवर 28 अन्य लोकांसह बलात्कार करणाऱ्या (28 Accused Raped Minor Girl) आरोपी बापाच्या संकटात वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशातील (UP) ललितपूरमध्ये (Lalitpur) 17 वर्षांच्या मुलीचे वडील, समाजवादी पार्टी (SP) आणि बहुजन समाज पार्टीच्या (BSP) नेत्यांसह अन्य व्यक्तींविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या दोन दिवसांनंतर आता मुलीच्या आईने पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. किडनॅप करुन बलात्कार पीडितेच्या आईसोबत केलं लग्न बलात्कार पीडित मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, पतीने तिच्या मुलीवर बलात्कार केला आणि मुलीच्या आईला देखील गेल्या अनेक वर्षांत कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागला. यामध्ये महिलेच्या सासरची मंडळांचाही समावेश आहे. महिलेने पती आणि सासरच्या मंडळींसह 11 लोकांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, 2003 मध्ये पतीने तिच्या आई-वडिलांना नशेचं औषध देत महिलेला किडनॅप केलं होतं. तो तिचे सोन्याचे दागिनेदेखील सोबत घेऊन आला होता. त्यानंतर महिलेला जबलपूरला आणण्यात आलं, येथे आरोपीच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत आर्य समाजातील एका मंदिरात त्या तिचं जबरदस्तीने लग्न केलं. गर्भवती झाली असतानाही महिलेला दिलं नाही जेवण महिलेने दावा केला आहे की, तिच्या पतीने लग्नाच्या पहिल्या दिवसापासून तिला मारहाण करण्यास सुरुवात केली होती. गर्भवती राहिल्यानंतर तिला गर्भपात (Abortion) करण्यास सांगण्यात आलं. मात्र जेव्हा तिने गर्भपात करण्यास नकार दिला, तर सासरच्या मंडळींनी तिला जेवण देणं बंद केलं. शेजारील मंडळी तिला जेवण देत होते. मुलीचा जन्म झाल्यानंतरही तिच्यावरील अत्याचार सुरूच होते. हे ही वाचा- नवमीला नरबळी देण्यासाठी सकाळपासून घेत होता शोध; 35 वर्षीय तरुणाची निघृणपणे हत्या बलात्कार पीडितेच्या आईने दावा केला आहे की, जेव्हा ती पुन्हा गर्भवती राहिली तर पत्नी तिच्या प्रायव्हेट पार्टला त्रास देण्याचा प्रयत्न केला. तिच्या सासरच्या मंडळींनी अनेक वेळा तिला विष देण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने ती यातून वाचली. महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपी स्वत:च्याच मुलीला अनेक ठिकाणी जाऊन विकण्याचा प्रयत्न केला होता आणि तिच्यावर बलात्कार केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.