मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

शेवटचं गंगेच्या घाटावर पाहिलं; सकाळी छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळला चिमुरडीचा मृतदेह

शेवटचं गंगेच्या घाटावर पाहिलं; सकाळी छिन्न-विछिन्न अवस्थेत आढळला चिमुरडीचा मृतदेह

सकाळी तिचा मृतदेह पाहून गावकऱ्यांना हादराच बसला.

सकाळी तिचा मृतदेह पाहून गावकऱ्यांना हादराच बसला.

सकाळी तिचा मृतदेह पाहून गावकऱ्यांना हादराच बसला.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंगेर, 5 ऑगस्ट : बिहारमधील (Bihar Crime News) मुंगेर येथून एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथील दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका 8 वर्षांच्या लहानगीवर बलात्कार केल्यानंतर अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली, असा संशय व्यक्त केला जात आहे. धक्कादायक म्हणजे चिमुरडीचा एक डोळादेखील काढण्यात आला आहे. या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले आहे. दुसरीकडे मुलीच्या नातेवाईकांना हे दु:ख पचवणं अवघड जात आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील सफियाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. सांगितलं जात आहे की, गंगा नदीत मच्छिमारे करण्याचं काम करणाऱ्या व्यक्तीची मोठ्या मुलीचा मृतदेह गुरुवारी सकाळी एका झाडाच्या खाली पडलेला आढळला.

डोळा काढला, हाताची बोटं चिरडली

मुलीचा मृतदेह पाहून तिची हत्या करण्यापूर्वी बलात्कार करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बलात्कारानंतर गुन्हा लपविण्यासाठी तिची हत्या करण्यात आली. मृतदेहाचा एक डोळादेखील काढण्यात आला. इतकच नाही तर मृतदेहाच्या दोन्ही हातांची बोट ठेचण्यात आली. या प्रकरणात गावकऱ्यांनी सांगितलं की, साधारण दुपारच्या 1 वाजता चिमुरडी आपल्या वडिलांसोबत गंगा घाटावर आली होती. तिच्या वडिलांनी तिला घरी पाठवलं आणि ते मारेमारी करण्यास निघून गेले. बराच वेळ झाला तरी मुलगी घरी न आल्याने कुटुंबीय काळजी करू लागले. आणि शेवटी तिचा तपास सुरू केला. सकाळी मुलीचा मृतदेह अत्यंत भयावह अवस्थेत झाडाखाली पडलेला आढळून आला.

हे ही वाचा-जमिनीच्या वादातून तुफान गोळीबार, दिवसाढवळ्या 5 जणांचा खून, गावात स्मशानशांतता

घटनास्थळी आढळले रक्ताचे निशाण

मृतदेहाबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून तो पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. मूलीवर आधी बलात्कार करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याशिवाय घटनास्थळावर रक्ताचे निशाणदेखील सापडले आहेत. या प्रकरणात प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Crime news, Rape