मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /मुंबईतील युवकाने गाठला कळस; छत्तीसगडमध्ये जात फेसबुक फ्रेंडसोबत धक्कादायक कृत्य

मुंबईतील युवकाने गाठला कळस; छत्तीसगडमध्ये जात फेसबुक फ्रेंडसोबत धक्कादायक कृत्य

Chhattisgarh crime: छत्तीसगडमधील कावर्धा जिल्ह्यातील पंडरिया पोलिसांनी (Pandaria police) एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (rape) करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अलीसान खान असे आरोपीचे नाव आहे.

कवर्धा, 26 एप्रिल : छत्तीसगडमधील कावर्धा जिल्ह्यातील पंडरिया पोलिसांनी (Pandaria police) एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार (rape) करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अलीसान खान असे आरोपीचे नाव आहे. तो मुंबईतील रहिवासी आहे.

फेसबुकच्या माध्यमातून मैत्री - 

आरोपीची कवर्धा जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. त्यानंतर त्याने काही अश्लील आणि आक्षेपार्ह छायाचित्रांच्या माध्यमातून अल्पवयीन मुलीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. आरोपी फोटोच्या माध्यमातून पीडितेचे शारीरिक शोषण करत होता. त्यानंतर पीडितेने संपूर्ण प्रकरणाची माहिती कुटुंबीयांना दिली. याप्रकरणी, अल्पवयीन मुलीच्या नातेवाइकांनी पंडरिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी तरुणाला त्याच्या लोकेशनच्या आधारे अटक केली. त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

 शारीरिक संबंध ठेवले - 

अलिसान अफजल खान (वय 24) याच्याशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाल्याचे अल्पवयीन मुलीने सांगितले होते. तुला रोज भेटायचे आहे. तू नाही भेटली तर तुझे अनेक आक्षेपार्ह फोटो इंटरनेटच्या माध्यमातून व्हायरल करेन, असे सांगून जबरदस्तीने दबाव टाकून अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवले.

पोलीस ठाण्याचे प्रभारी मुकेश यादव यांनी एक विशेष पथक तयार करून पोलीस ठाण्याच्या हद्दीसह अन्य जिल्ह्यांमध्ये व अन्य राज्यांमध्ये विशेष पथक पाठवून आरोपीचा शोध घेतला. त्यावरुन आरोपी मुंबई महाराष्ट्रात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने आरोपीला जेरबंद केले. आरोपी अलीसन अफजल खान याला (साकीन यादव चाल, बैरामबांग जोगेश्वरी बेस्ट, मुंबई) महाराष्ट्र येथूल त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयीन कोठडीवर कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Chhatisgarh, Crime, Facebook, Rape