भोपाळ, 12 ऑगस्ट : दुसऱ्यांची दु:ख दूर करण्याचा दावा करणारे आणि समोरच्या व्यक्तीचे अश्रू पुसल्याचा दावा करणारे मिर्ची बाबा सध्या तुरुंगात रडत आहे. या ढोंगी बाबाची पोलखोल झाल्यानंतर अनेकांना धक्का बसला. विश्वास आणि आस्थेच्या नावाखाली भक्तींच्या डोळ्यात धूळ फेकणाऱ्या बाबाचं एक एक कारस्थान समोर आलं आहे. तंत्र-मंत्राच्या नावाखाली बाबाने आतापर्यंत कितीतरी महिलांवर अत्याचार केले आहेत.
आतापर्यंत बाबाच्या पायाशी लोटांगण घालणारे आता बाबाच्या कृत्यावर संताप व्यक्त करीत आहे. मध्य प्रदेशात वैराग्याचं नाटक करीत फिरणाऱ्या बाबाची पोलखोल झाली आहे. मिर्ची बाबाला भोपाळ पोलिसांनी ग्वाल्हेरमधून ताब्यात घेतलं आहे. यानंतर 22 ऑगस्टपर्यंत बाबांना तुरुंगात राहावं लागणार आहे.
सर्व पुरावे बाबांच्या विरोधात...
मिर्ची बाबा तुरुंगात ओक्साबोक्सी रडत आहेत. आपण काहीही गुन्हा केला नसल्याचं ते येथे सांगत असले तरी सर्व पुरावे त्यांच्याविरोधातच आहेत. बाबांवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. बाबांच्या घराशेजारी लोकांनीही अनेक खुलासे केले. त्यांच्या घरी वारंवार कोणीना कोणी भेटायला येत. अनेकदा महिला आणि तरुणी एकट्याच भेटायला येत.
बलात्काराचा आरोपी मिर्ची बाबाला अटक; मोबाइलमध्ये अश्लील क्लिप अन् अनेक किळसवाणी कृत्य
ज्या महिलांना मुल होण्यासाठी औषध देत, त्यांनाही ते घरी एकटं बोलवतं. एकटेपणाचा फायदा घेत बाबाने त्यांच्यावर बलात्कार केला होता. महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, पहिल्यांदा ती आश्रमच्या तळमजल्यावर बाबांना भेटली होती. यावेळी त्यांनी काही औषधं आणि भुकटी दिली. खोलीत जाऊन हे खाण्यास सांगितलं. हे खाल्ल्यानंतर महिलेला चक्कर येऊ लागली. तिला नशेसारखं होऊ लागलं. या अवस्थेत बाबाने तिच्यावर बलात्कार केला.
तसं बाबांनी आश्रमात अनेक सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. मात्र जेथे बाबाला महिलांची भेट घेत होते, तेथे मात्र सीसीटीव्ही फुटेज नव्हते.
मोबाइलमध्ये पॉर्न क्लिप..
जेव्हा बाबांना अटक करण्यात आलं, तेव्हा त्यांच्या मोबाइल फोनचा तपास करण्यात आला. त्यांच्या फोनमध्ये अश्लील क्लिप होते. अनेक महिलांचे फोन नंबर तर पाच फौजींच्या पत्नीचे नंबरही सेव्ह केले आहेत. मिर्ची बाबाचं खरं नाव राकेश दुबे आहे. आधी ते एका ऑइल मिलमध्ये मजूर म्हणून काम करीत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Madhya pradesh