ग्वाल्हेर, 9 ऑगस्ट : ग्वाल्हेर पोलिसांनी बहुचर्चित मिर्ची बाबा यांला रात्री अटक केली आहे. मिर्ची बाबा यांच्यावर भोपाळच्या गोविंदपुरा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबाकडे एक मोबाइल सापडला असून त्याच पॉर्न क्लिप आहेत. सोबतच अनेक महिलांचे फोननंबरदेखील आहेत. रात्री ग्वाल्हेरचे एसएसपी अमित सांघी यांना भोपाळचे पोलीस आयुक्तांनी सूचना दिली होती, त्यानुसार ग्वाल्हेरच्या गिरगावमध्ये मिर्ची बाबा भागवत कथेसाठी आले असून त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. यानंतर रात्रीतूनच मिर्ची बाबांना अटक करण्यासाठी पोलीस निघाले होते. ते एका हॉटेलमध्ये थांबल्याची माहिती मिळाली होती. मात्र पोलीस तेथे पोहोचले, तोपर्यंत बाबा निघून गेले होते. थोड्या अंतरावरच पोलिसांनी त्यांना घेरलं अन् अटक केली. रात्री बाबा पळून जाण्याच्या तयारीत होते. तेव्हाच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एक मोबाइल जप्त करण्यात आला. तो पाहून पोलीस अधिकारी हैराण झाले. मोबाइलमध्ये अनेक पॉर्न व्हिडीओ आहेत. सोबतच अनेक महिलांचे नंबर असून त्यात त्यांनी त्या महिलेच्या पतीचं नाव लिहून पुढे पत्नी असं लिहिलं होतं. याशिवाय पाच नंबर असेही दिसले जे फौजीची पत्नी नावाचे सेव्ह केले होते.
काय आहे प्रकरण? मिळालेल्या माहितीनुसार, भोपालमधील गोविंदपुरा पोलीस ठाण्यात 17 जलै 2022 रोजी रायसेनच्या एका महिलेने मिर्ची बाबावर दुष्कृत्य केल्याचा आरोप केला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली. याशिवाय बाबाच्या अटकेचा प्लान तयार केला. बाबा ग्वाल्हेरमध्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रणनीती तयार करून बाबाला अटक केली.