मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

शिक्षेच्या भीतीने बलात्काराच्या आरोपीचं पीडितेशी लग्न, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने पोलिसांसमोर शुभमंगल

शिक्षेच्या भीतीने बलात्काराच्या आरोपीचं पीडितेशी लग्न, दोन्ही कुटुंबांच्या संमतीने पोलिसांसमोर शुभमंगल

तरुणीवर बलात्कार (rape) केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या आरोपीने (suspect) त्याच तरुणीशी (woman) लग्न (marriage) केलं.

तरुणीवर बलात्कार (rape) केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या आरोपीने (suspect) त्याच तरुणीशी (woman) लग्न (marriage) केलं.

तरुणीवर बलात्कार (rape) केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या आरोपीने (suspect) त्याच तरुणीशी (woman) लग्न (marriage) केलं.

  • Published by:  desk news
रोहतक, 27 ऑगस्ट : तरुणीवर बलात्कार (rape) केल्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या आरोपीने (rape accused) त्याच तरुणीशी (rape victim) लग्न (marriage) केलं. पोलिसांनी अटक केल्यानंतर कारवाईच्या भीतीने घाबरलेल्या आरोपीने सर्वांदेखत तरुणीशी लग्न करण्याची तयारी दाखवली. तरुणी आणि तिचा परिवारही त्याला तयार झाला. दोन्ही परिवारांच्या सहमतीने पोलिसांच्या (Police) उपस्थितीत दोघांचं शुभमंगल पार पडलं. कारवाईची भीती हरियाणातील रोहतकमध्ये राहणाऱ्या तरुणीवर दिल्लीच्या एका आरोपीने लैंगित अत्याचार केले होते. याबाबत दाखल झालेल्या तक्रारीवरून रोहतक पोलिसांनी दिल्लीतून या तरुणाला आणि त्याच्या कुटुंबाला अटक करून रोहतकमध्ये आणलं होतं. पोलिसांच्या कारवाईला आणि शिक्षेला घाबरलेल्या या तरुणाने संबंधित तरुणीशी लग्न करण्याची तयारी दाखवली. पोलिसांनी तरुणीला आणि तिच्या कुटुंबीयांना पोलीस स्टेशनला बोलावलं. तरुणाने त्यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडला. तरुणीही याला तयार झाल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी या प्रस्तावाला होकार दर्शवला. समाजमंदिरात झालं लग्न यानंतर दोन्ही पक्ष पोलिसांसह समाजमंदिरात गेले आणि तिथं दोघांचं लग्न लावण्यात आलं. लग्नकार्य पूर्ण होईपर्यंत पोलीस घटनास्थळी उपस्थित होते. पुढील दोन दिवसात लग्नाचं रजिस्ट्रेशन करून त्याची कॉपी आपण पोलीस ठाण्यात आणून देऊ, असं लेखी आश्वासन पोलिसांनी तरुणाकडून घेतलं आणि त्याच्यावरचा गुन्हा मागे घेण्यात आला. हे वाचा - Video: कवडीमोल भाव, नाराज शेतकऱ्यांनी क्रेट्सनं भरलेले टोमॅटो फेकले रस्त्यावर अशी झाली होती ओळख 2018 साली या तरुणाची तरुणीसोबत फेसबुकवरून ओळख झाली होती. त्यानंतर ओळखीचं रुपांतर मैत्रीत झालं. दोघांनीही एकमेकांना भेटायचं ठरवलं. एका हॉटेलमध्ये ते दोघं भेटले. त्यावेळी तरुणानं तिच्यावर जबरदस्ती केली. याची माहिती कुणाला दिल्यास जिवे मारण्याची धमकीदेखील दिली. या घटनेनंतर धक्का बसलेल्या तरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. पोलीस ठाण्यात ठरलेल्या आणि पोलिसांच्या देखरेखीखाली पार पडलेल्या या लग्नाची सध्या पंचक्रोशीत जोरदार चर्चा रंगत आहे.
First published:

Tags: Crime, Marriage, Rape accussed

पुढील बातम्या