मृत्यूंजय कुमार, प्रतिनिधी बोकारो, 23 जून : झारखंडच्या चास मंडल कारागृहातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात अटक असलेला कैदी कारागृहात उंचावरून पडल्याने गंभीर जखमी झाला आहे. महादेव रजवार असं त्याचं नाव असून त्याला तातडीने बोकारोच्या सदर रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र त्याची गंभीर स्थिती पाहता डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्याला रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यास सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, महादेवची आई आणि बहीण कारागृहाच्या गेटवर त्याला भेटण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी महादेवचं त्या दोघींशी जोरदार भांडण झालं. हे भांडण सोडवायला सुरक्षा रक्षकांना मध्ये पडावं लागलं. ते महादेवाला आत घेऊन गेले. त्यानंतरच महादेवचा हा अपघात झाला. त्यामुळे या वादातूनच त्याने उंचावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज लावण्यात येत आहे. मात्र असं असेल तर कारागृह प्रशासनाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
कारागृह प्रशासनाकडून मात्र याबाबत सखोल माहिती मिळालेली नाही. कारागृह अधीक्षक अनिमेश चौधरी यांनी सांगितलं, ‘कैदी महादेव रजवारला नक्की कशी दुखापत झाली, याबाबत इतर कैद्यांची चौकशी केली जात आहे. ठोस माहिती मिळाल्यावर ती सांगितली जाईल.’ 5 किंग कोब्रा समोर फणा काढून बसले होते, तरीही त्यांना KISS करायला गेला व्यक्ती अन्.., Shocking Video तर, दुसरीकडे सदर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, महादेवच्या डोक्याला आणि जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला. एवढी मोठी दुखापत उंचावरून पडल्यावरच होऊ शकते. चांगल्या उपचारांसाठी त्याला रिम्स रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दरम्यान, महादेवाला बलात्काराच्या गुन्ह्यात 18 ऑगस्ट 2022 रोजी अटक करण्यात आली होती.