जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / आधी शेअर कोसळले आता FIR दाखल! रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ, काय आहे प्रकरण?

आधी शेअर कोसळले आता FIR दाखल! रामदेव बाबांच्या अडचणीत वाढ, काय आहे प्रकरण?

आधी शेअर कोसळले आता FIR दाखल!

आधी शेअर कोसळले आता FIR दाखल!

Baba Ramdev Controversial Statment: बाडमेरमधील संतांच्या मेळाव्यात योगगुरू बाबा रामदेव यांनी मुस्लिम समाजाविषयी अपशब्द वापरले होते.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

बाडमेर, 5 फेब्रुवारी : बाबा रामदेव यांच्या अडचणी संपण्याचं नाव घेताना दिसत नाही. कालच बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीचे शेअर कोसळले होते. अशातत आता आणखी एक वाईट बातमी आली आहे. रविवारी एका स्थानिक व्यक्तीने धार्मिक भावना भडकावल्याच्या आरोपाखाली राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील चौहान पोलीस ठाण्यात योगगुरू स्वामी रामदेव यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला. याबाबत पोलिसांनी माहिती दिली. चौहानचे पोलीस अधिकारी भुताराम यांनी सांगितले की, स्थानिक रहिवासी पठाई खान यांनी रविवारी धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी सांगितले की, नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या कलम 153 (ए), 295 (ए) आणि 298 नुसार गुन्हा नोंदवून तपास केला जात आहे. गुरुवारी बाडमेरमध्ये झालेल्या संतांच्या मेळाव्यात योगगुरू बाबा रामदेव यांनी हिंदू धर्माची इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माशी तुलना केली आणि मुस्लिमांवर दहशतवादाचा आणि हिंदू मुलींचे अपहरण केल्याचा आरोप केला. योगगुरू बाबा रामदेव यांनी आरोप केला की इस्लाम आणि ख्रिश्चन हे दोन्ही धर्मांना धर्मांतराचे वेड लागले आहे, तर हिंदू धर्म आपल्या अनुयायांना चांगले जीवन जगण्यास शिकवतो. वाचा - बापरे! 48 बंदुका, 150 कोयते; पुणे पोलिसांच्या मिशन ऑल आउटमध्ये 110 गुंड जेरबंद यापूर्वीही वादग्रस्त विधाने बाबा रामदेव हे त्यांच्या बेधडक आणि वादग्रस्त वक्तव्यांमुळे प्रसिद्धीच्या झोतात येत असतात. यापूर्वी पतंजली योगपीठावर 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर ते म्हणाले होते की, लवकरच पाकिस्तानचे चार तुकडे केले जातील. ते म्हणाले, “सिंध, बलुचिस्तान, पंजाब आणि पाकव्याप्त काश्मीर ही सर्व स्वतंत्र राष्ट्रे होतील आणि पाकिस्तान वेगळा देश राहील.”

News18लोकमत
News18लोकमत

तर नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका कार्यक्रमात ते म्हणाले, की स्त्रिया साडी, सलवार कमीज किंवा “काहीही न घालता” देखील छान दिसू शकतात. या वक्तव्यानंतरही त्यांच्यावर भरपूर टीका झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात