Home /News /crime /

3 वर्षे Live-in मध्ये; लग्नाच्या 13 दिवसांपूर्वी तरुणीची आत्महत्या, कुटुंबाला धक्का

3 वर्षे Live-in मध्ये; लग्नाच्या 13 दिवसांपूर्वी तरुणीची आत्महत्या, कुटुंबाला धक्का

आत्महत्येपूर्वी तरुणीने सुसाइड नोट लिहिली असून यातून मोठा खुलासा झाला आहे.

    जयपूर, 28 जानेवारी : राजस्थानमधील (Rajasthan News) भीलवाडामध्ये 22 वर्षांच्या तरुणीने आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणीचा तीन वर्षांपूर्वी साखरपुडा झाला होता. तरुण-तरुणींमध्ये प्रेमप्रकरण सुरू होतं आणि दोघेही पती-पत्नीप्रमाणे राहत होते. लग्नाच्या एक महिन्यापूर्वीच तरुणाच्या कुटुंबासोबतच नातं तोडलं होतं. आरोपी आहे की, त्यांनी 5 लाखांची मागणी केली होती. पैसे मिळाले नाही म्हणून त्यांनी तरुणीसोबत नातं तोडलं होतं. याशिवाय तरुणीकडे एक सुसाइड नोटही सापडली आहे. यामध्ये तिने सासरच्या मंडळींनी हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. नातं तोडू नये म्हणून तरुणी त्यांची विनवणी करीत होती. मात्र त्यांनी ऐकलं नाही. शेवटी गुरुवारी सायंकाळी तरुणीने सल्फासच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली. 10 फेब्रुवारी रोजी लग्न होणार होतं.. ही घटना राजस्थानातील बिगोदमधील गावातील आहे. प्रियांका (22) भिलवाडामध्ये राहून पीटीआयची तयारी करीत होती. तर आशिष (24) देखील भिलवाडामध्ये मुलांची शिकवणी घेत होता. दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू होतं, आणि ते लिव्ह-इनमध्ये राहत होते. तीन वर्षांपूर्वी कुटुंबीयांना याबाबत कळाल्यानंतर त्यांनी दोघांचा साखरपुडा लावून दिला. 10 फेब्रुवारी रोजी समाजाच्या सामूहिक विवाह संमेलनात त्यांचं लग्न होणार होतं. मुलीच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, लग्नाच्या तयारीसाठी सासरच्या मंडळींनी प्रियंकाला खरेदीसाठी 5 जानेवारी रोजी भिलवाडा येथे बोलावलं होतं. येथे सासरची मंडळी तिला घरी घेऊन हेले आणि लग्नाला नकार दिला. सासरच्या मंडळींनी प्रियंकाकडे 5 लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. तरुणीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती नाजूक आहे. त्यामुळे ते सामूहिक विवाह कार्यक्रमात लग्न करीत होते. प्रियांकाच्या मृतदेहाजवळ सुसाइड नोटही सापडली आहे. कुटुंबीयांनी सांगितलं की, सुसाइड नोटमध्ये नातं तोडणे आणि सासरच्यांच्या सर्व मागण्या हळूहळू पूर्ण करण्याचा उल्लेख केला आहे. सुसाइड नोटमध्ये तरुणी वारंवार लग्न न तोडण्याची विनंती करीत आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणात सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे ही वाचा-आधी Rape, मग अश्लील व्हिडीओ; 3 मित्रांसोबत शेअर केल्यानंतर थरकाप उडवणारा प्रकार प्रियंकाच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, आशिष बऱ्याच वर्षांपासून प्रियांकाला लग्नाचं आमिष दाखवित होता. दोघेही भिलवाडात पती-पत्नीप्रमाणे राहत होते. हे नातं तुटल्यामुळे प्रियांका तणावात होती. गुरुवारी सायंकाळी तिने विष खाऊन आत्महत्या केली.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Marriage, Rajasthan, Suicide

    पुढील बातम्या