Home /News /ahmednagar /

बैल गेला अन् झोपा केला! लघवी करेपर्यंत भामट्यांनी पळवला भलामोठा ट्रक, अहमदनगरमधील विचित्र घटना

बैल गेला अन् झोपा केला! लघवी करेपर्यंत भामट्यांनी पळवला भलामोठा ट्रक, अहमदनगरमधील विचित्र घटना

Crime in Ahmednagar: अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एक विचित्र घटना घडली आहे. येथील एक ट्रकचालक रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून लघुशंका करण्यासाठी गेला (driver Went to urinate) असता, काही भामट्यांनी क्षणात भलामोठा ट्रक गायब (Theft truck) केला आहे.

पुढे वाचा ...
    अहमदनगर, 24 जानेवारी: अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील श्रीगोंदा (Shrigonda) तालुक्यात एक विचित्र घटना घडली आहे. येथील एक ट्रकचालक रस्त्याच्या कडेला ट्रक उभा करून लघुशंका करण्यासाठी (driver Went to urinate) असता, काही भामट्यांनी क्षणात भलामोठा ट्रक गायब (Theft truck) केला आहे. पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओमधून आलेल्या तिघांनी हा ट्रक पळवून नेला आहे. या प्रकरणी ट्रकचालकाने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. भारत विष्णू धोत्रे (रा. उरळी कांचन, पुणे), नितीन शिवाजी दरेकर (रा. शिंदेवाडी, बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं असून यामध्ये आणखी एका अज्ञात व्यक्तीचा समावेश आहे.  तर ट्रकचालक मुकिंदा पाचपुते यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी ट्रकचालक लघुशंका करून येईपर्यंत आरोपींनी भलामोठा ट्रक गायब केल्याचं ऐकून पोलीस देखील हैराण झाले आहेत. हेही वाचा-भूतबाधा झाल्याचं सांगून लावला 32 लाखांचा चुना, डोंबिवलीतील महिलेसोबत घडलं विपरीत नेमकं काय घडलं? घटनेच्या दिवशी फिर्यादी ट्रकचालक आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव फाटा परिसरातून जात होते. दरम्यान त्यांना लघुशंका आली. यामुळे त्यांनी संबंधित ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केला आणि लघवी करण्यासाठी गेले. यावेळी पाठीमागून पांढऱ्या रंगाच्या स्कार्पिओमधून आलेल्या तीन जणांनी हा भलामोठा ट्रक लंपास केला आहे. हा प्रकार घडल्यानंतर स्कार्पिओ नंबर प्लेटच्या आधारावर पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. हेही वाचा-चांगुलपणा नडला! मध्यस्थी करायला गेला अन् मारेकऱ्यांचा ठरला बळी, बीडमधील घटना दुसऱ्या एका घटनेत, काल अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथून अशाप्रकारे एक ट्रक चोरीला गेला आहे. संबंधित ट्रकचालक पाथर्डी तालुक्यात मुक्कामी थांबला होता. यावेळी त्याने एका हॉटेलसमोर ट्रक उभा करून झोपायला गेला होता. पण सकाळी झोपेतून उठला तेव्हा हॉटेल समोर लावलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळवून नेला होता. या प्रकरणी ट्रकचालक सरफराज रब्बानी सय्यद यानं पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmednagar, Crime news

    पुढील बातम्या