पिंपरी, 16 सप्टेंबर : पुण्यात दिवसेंदिवस अत्याचार, तसेच आत्महत्येच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. आणखी एक धक्कादायक घटना पुण्यातून उघडकीस आली आहे. मैत्रिणीसमोर मारहाण करून तरुणाला अपमानित केल्यानंतर तरुणाला वाईट वाटल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. खूप वाईट वाटल्याने तरुणाने गळफास घेऊन आपले जीवन संपविले.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना 25 मे 2022 रोजी घडली आहे. याप्रकरणी बुधवारी 14 सप्टेंबरला भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रतीक संतोष कुतवळ (रा. शास्त्री चौक, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याचे वडील संतोष जालिंदर कुतवळ (वय ४२, रा.भोसरी) यांनी फिर्याद दिली. यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश महादू पठारे (वय २०, रा. पठारे मळा, चऱ्होली) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्रतीक याचे त्याच्या एका मैत्रिणीसोबत प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधांवरून प्रतिक याला त्याच्या मैत्रिणीसमोर आरोपीने मारहाण केली तसेच अपमानित केले. यामुळे मैत्रिणीसमोर मारहाण केल्याने प्रतीक याला खूपच वाईट वाटले होते. यातूनच त्याने गळफास घेत आपले जीवन संपवले. दरम्यान, आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा - तरुणीला फोन का करतो? असे म्हणत पोलिसाकडून सतत मारहाण, पुण्यातील किर्तनकाराचं भयानक पाऊल
'या' कारणामुळे लोणावळ्यातील तरुणीचीही आत्महत्या -
लोणावळ्यातील रामनगर येथे प्रेमविवाह करण्याचं स्वप्न पाहिलेल्या तरुणीने आत्महत्या केली आहे. परभणी येथील तरुणाने लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीने आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचललं आहे. आत्महत्येपूर्वी तरुणीने लिहिलेल्या चिठ्ठीवरुन लग्नास नकार मिळाल्याने तिने हे पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालं आहे, अशी माहिती लोणावळा पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेमुळं लोणावळ्यातील रामनगर येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत असून लवकरच पुढील कारवाई करण्यात येईल, असं सांगितलं जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Death, Pune crime news