पुणे, 01 मार्च: सोशल मीडिया (Social Media) हा प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप यासारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून दूरवरच्या लोकांशी संपर्क साधणं, ओळखी होणं या गोष्टी अगदी सहज झाल्या आहेत. अशा ओळखींमधूनच मैत्री आणि त्यापुढे प्रेमाचा टप्पा गाठला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून होणाऱ्या संवादातून परस्परांना न भेटताच दोन अनोळखी व्यक्ती एकमेकांच्या प्रेमात पडल्याच्या अनेक घटना आपण ऐकतो, वाचतो. यातून फसवणूक होण्याचेही प्रमाण मोठे आहे. अशाच ऑनलाईन लव्हस्टोरीत (Online Love story) पुण्यातील एका विवाहित महिलेनं आपला पती आणि मुलाला (Mother of a Child) सोडून चक्क प्रियकराला भेटण्यासाठी उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूर (Kanpur) गाठलं असल्याचं उघडकीस आलं आहे. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून या तरुणीला तिच्या घरी परत पाठवलं आहे. सध्या या प्रेमकथेची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. हे वाचा- परभणीत मध्यरात्री घडला खुनी थरार; रुग्णालयाच्या गेटसमोरच कामगाराला दगडानं ठेचलं मीडिया रिपोर्ट्सनुसार, कानपूरमधील चक्री इथल्या एका 20 वर्षांच्या तरुणाची 4 महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवरून पुण्यातील एका 24 वर्षीय तरुणीशी ओळख झाली. इन्स्टाग्रामवर चॅटिंग करताकरता दोघांची मैत्री वाढली आणि दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रेमाच्या गुजगोष्टी करताकरता ते लग्नापर्यंत पोहोचले. अखेर या प्रेयसीने तरुणाला पुण्याला तिच्या घरी येण्यास सांगितलं. मात्र या तरुणानं ते गांभीर्यानं घेतलं नाही, हसून टाळलं. काहीच दिवसांत मात्र त्याला जबरदस्त धक्का बसला कारण एकेदिवशी अचानक त्याची ही प्रेयसी पुण्याहून थेट कानपूरमध्ये पोहोचली आणि त्याच्यासोबत कायमचं राहण्यासाठी घर सोडून आल्याचं तिनं सांगितलं. अचानक ही तरुणी समोर आल्यानं हा तरुण घाबरला. त्यानं तिला आपल्या एका परिचितांच्या घरी ठेवलं आणि घरातील लोकांना कल्पना दिल्यानंतर लग्न करण्याचं आश्वासन या तरुणीला दिलं. त्यानुसार त्यानं आपल्या घरच्या लोकांना आपल्या प्रेमप्रकरणाची माहिती दिली आणि या मुलीसोबत कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तरुणाच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली. आठवडाभरानंतर तो तिला घरीच घेऊन आला तेव्हा तर हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झाला. कुटुंबीयांनी या तरुणीला तिच्या घरी परत पाठवण्याचा आग्रह धरला, तर हा तरुण तिला पाठवणार नाही यावरच अडून बसला. त्यामुळे शेवटी हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. हे वाचा- ‘शाप लागल्याने ब्लॉकेज झालेत’ भीती दाखवत भोंदूने इंजिनिअरला लावला 10लाखांचा चुना हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी त्या मुलीला तिच्या घरच्यांशी बोलायला लावलं. त्यावेळी पती आणि अडीच वर्षांच्या मुलाला सोडून ती आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी कानपूरला आल्याचे उघडकीस आलं. हे ऐकून या तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला आणि त्याच्या कुटुंबीयांनाही मोठा धक्का बसला. चक्री पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याची ही तरुणी इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या प्रियकराला भेटण्यासाठी 13 फेब्रुवारी 22 रोजी थेट कानपूरला येऊन धडकली होती. ती विवाहित असल्याचं आणि तिला अडीच वर्षांचा मुलगा असल्याचं कळताच प्रियकरालाही धक्का बसला. अखेर पोलिसांनी या तरुणीची समजूत घालून तिला तिच्या घरी परत पाठवून दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.