जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / केस कापायला गेले पंडितजी, घरी आले तर शेंडी होती गायब! सलून चालकावर पोलिसांत FIR दाखल

केस कापायला गेले पंडितजी, घरी आले तर शेंडी होती गायब! सलून चालकावर पोलिसांत FIR दाखल

केस कापायला गेले पंडितजी, घरी आले तर शेंडी होती गायब! सलून चालकावर पोलिसांत FIR दाखल

नेहमीप्रमाणं ठरलेल्या सलूनमध्ये (Hair cutting saloon) केस कापायला गेलेले पंडितजी जेव्हा घरी आले, तेव्हा आपल्या डोक्यावरील शेंडी गायब झाल्याचं त्यांना समजलं.

  • -MIN READ
  • Last Updated :

डेहराडून, 9 ऑगस्ट : नेहमीप्रमाणं ठरलेल्या सलूनमध्ये (Hair cutting saloon) केस कापायला गेलेले पंडितजी जेव्हा घरी आले, तेव्हा आपल्या डोक्यावरील शेंडी गायब झाल्याचं त्यांना समजलं. ते पाहून त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी थेट सलूनचालकाविरोधात (saloon owner) पोलिसांत गुन्हा (FIR) नोंदवला. डेहराडूनमध्ये (Deharadun) घडलेल्या या घटनेशी चर्चा पूर्ण राज्यभरात रंगली आहे. अशी घडली घटना डेहराडूनमधील एका सलूनमध्ये पंडितजी नेहमीप्रमाणं केस कापायला गेले. केस कापून झाल्यावर त्यांनी त्यांच्या केसांना कलरही करून घेतला. कलर वाळल्यानंतर अंघोळ करण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. त्यानुसार ते घरी आले आणि केसाचा रंग वाळेपर्यंत त्यांनी वाट पाहिली. रंग वाळल्यानंतर ते अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेले. डोक्यावरून पाणी ओतून घेताना जेव्हा त्यांच्या हाताला शेंडी लागली नाही, तेव्हा काहीतरी चुकल्यासारखे त्यांना वाटले. त्यांनी डोक्यावर हात फिरवून पुन्हा एकदा खातरजमा करून घेतली. मात्र सलूनमध्ये केस कापताना आपली शेंडीदेखील कापली गेल्याचं क्षणार्धात त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि कशीबशी अंघोळ उरकून ते सलूनपाशी पोहोचले. कडाक्याची भांडणं आपली शेंडी कापल्याच्या मुद्द्यावरून पंडितजी आणि सलूनवाल्यामध्ये कडाक्याचं भांडण झालं. दोघांनीही एकमेकांना यथेच्छ शिव्या दिल्या आणि मोठी गर्दी तिथं जमा झाली. काही वेळाने मात्र पंडितजींचा आवेश पाहून सलून चालक वरमला आणि त्यांची माफी मागू लागला. मात्र त्याला माफ करण्याच्या मूडमध्ये पंडितजी बिलकूल नव्हते. त्यांनी त्याच रागात पोलीस स्टेशन गाठलं आणि सलून चालकाविरोधात तक्रार दाखल केली, अशी बातमी ‘ आज तक' ने दिली आहे. हे वाचा - लोकल सुरु करण्याच्या निर्णयावर रावसाहेब दानवेंचा राज्य सरकारला दणका, म्हणाले… पोलीस तक्रार धार्मिक भावना दुखावणे, शिविगाळ करणे, मारपीट करणे आणि जीवे मारण्याची धमकी देणे, असे गुन्हें सलून चालकाविरोधात नोंदवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकऱणी कारवाई करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात