पाटना, 31 जानेवारी : तुमच्या मुलींनाही जर पबजीसारखा (Pubg Game) गेम खेळायला आवडत असेल आणि तुम्ही त्यांना थांबवू शकत नसाल तर सावधान. कारण पबजी गेमच्या आड लैंगिक शोषणाचा प्रकार समोर आला आहे. (Sexual Assault) ही घटना बिहारमधील (Bihar news) आहे. येथे पबजी खेळत असताना एका चलाख तरुणाने मुलींना आपल्या जाळ्यात ओढलं. यानंतर तो तब्बल 4 वर्षे मुलींचं लैंगिक शोषण करीत होता. जेव्हा तरुणींना आपल्या चुकीची जाणीव झाली, तर त्यांनी या गोष्टींचा विरोध केला.
गेल्या 4 वर्षांपासून धनौत येथे राहणारा ऋतिक राज एका मुलीचं लैंगिक शोषण करीत आहे. सुरुवातील त्याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि व्हिडीओ कॉलिंगदरम्यान एक अश्लील व्हिडीओ आणि फोटोचा स्क्रिन शॉट घेतला. या आधारे तो मुलीला ब्लॅकमेल करीत होता. यानंतरही हवं तेव्हा, हव्या त्या ठिकाणी मुलीला बोलावून तिचं शारिरीक शोषण करीत होता. शेवटी तरुणीने संतापून पोलिसांची मदत घेतली.
पोलिसांच्या बऱ्याच तपासानंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी जेव्हा आरोपीचा मोबाइल पाहिला तेव्हा एकाच तरुणीचे नाही तर अनेक तरुणींना पबजीच्या माध्यमातून फसवल्याचा प्रकार समोर आला. आरोपीच्या मोबाइलमधून अनेक तरुणांचे अश्लील व्हिडीओ आहेत. इतकच नाही तर तरुणाकडे गांजा आणि मॅनफोर्स टॅबटेलदेखील जप्त करण्यात आले आहेत.
हे ही वाचा-मॉडेलचा हॉटेलच्या गच्चीवरुन उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न; जीव वाचला, मात्र...
पीडित तरुणीने सांगितलं की, चार वर्षांपूर्वी पबजी गेम खेळताना ऋतिक राजने आमच्यासोबत जबरदस्ती मैत्री केली होती. यानंतर तो माझ्यासोबत शरीरसंबंध ठेवत जबरदस्ती व्हिडीओ शूट करीत होता. याशिवाय व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत माझं सतत लैंगिक शोषण करीत होता.
पीडिताने पुढे सांगितलं की, आरोपीने माझ्या मोबाइलवर एनीडेस्ट सॉफ्टवेअर अपलोड करून माझा मोबाइल हॅक केला होता. सोबतच माझा मेल आयडी, इन्स्टाग्राम, फेसबुक सर्व ऑपरेट करीत होता. तरुणीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने इन्स्टावर फेक अकाऊंट तयार करून त्यात न्यूड व्हिडीओ शेअर केला आणि यानंतर तो सतत मला धमकी देऊन पैसे मागत होता. पीडितेच्या जबाबानंतर आरोपी ऋतिक राजने आपला गुन्हा कबुल केला आहे. त्याने आणखी बऱ्याच तरुणींसोबत असं घृणास्पद कृत्य केलं आहे, असंही त्याने यावेळी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bihar, Crime news, Online fraud, PUBG, Pubg game