मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

35 हजार फोन नंबर, 600 जण संशयित; बाळ पळवणाऱ्या महिलेचा शोध घेणाऱ्या पोलिसांना फुटला घाम

35 हजार फोन नंबर, 600 जण संशयित; बाळ पळवणाऱ्या महिलेचा शोध घेणाऱ्या पोलिसांना फुटला घाम

बेंगळुरू (Bengaluru) इथं घडलेली एक घटना एखाद्या सस्पेंस थ्रिलर चित्रपटाची कथा असावी अशी आहे. हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी यातील संबंधित लोकांची पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे.

बेंगळुरू (Bengaluru) इथं घडलेली एक घटना एखाद्या सस्पेंस थ्रिलर चित्रपटाची कथा असावी अशी आहे. हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी यातील संबंधित लोकांची पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे.

बेंगळुरू (Bengaluru) इथं घडलेली एक घटना एखाद्या सस्पेंस थ्रिलर चित्रपटाची कथा असावी अशी आहे. हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी यातील संबंधित लोकांची पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे.

बेंगळुरू 02 जून: आपल्याला बाळ (Baby) व्हावं यासाठी अनेकदा लोक काहीही करायला तयार असतात. यातून ते कोणत्याही टोकाला जातात. याचाच प्रत्यय देणारी एक घटना बेंगळुरू (Bengaluru) इथं घडली आहे. एखाद्या सस्पेंस थ्रिलर चित्रपटाची असावी अशी ही कहाणी आहे. फ्लॅशबॅक 1: हुबळी (2015) हे संपूर्ण प्रकरण समजून घेण्यासाठी यातील संबधित लोकांची पार्श्वभूमी जाणून घेणं गरजेचं आहे. रश्मी (Rashmi) ही 31 वर्षीय महिला मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist) म्हणून हुबळी (Hubbballi) इथल्या एका नामांकित रुग्णालयात कार्यरत होती. एके दिवशी एक महिला तिच्या मानसिक दिव्यांग मुलासह उपचाराकरता आली. दोन तीन भेटीतच मुलाच्या स्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याचं त्या आईच्या लक्षात आलं, तिचा रश्मीवरील विश्वास वाढला. दोघी चांगल्या मैत्रिणी झाल्या. एकदा त्या मुलाच्या आईनं काही आरोग्यविषयक समस्यांमुळे आपण पुन्हा आई बनू शकत नसल्याचं सांगितलं. त्यावर रश्मीने तिला सरोगसीची (Surrogacy) कल्पना सुचवली. नवऱ्याशी चर्चा केल्यानंतर त्या आईनं याला मान्यता दिली. रश्मीने यातील तज्ज्ञ डॉक्टर आपल्याला माहित असून सरोगेट आईसुद्धा ती मिळवून देईल असं सांगितलं. तिने स्पर्मचे नमुनेही घेतले आणि ते ती संबंधित टीमकडे पाठवणार असल्याचं तिनं त्या मुलाच्या आईला सांगितलं. फ्लॅशबॅक 2: बेंगळुरू (2019) चार वर्षांच्या कालावधीनंतर रश्मी बेंगळुरूच्या बाणेरघट्टा (Bannerghatta) रोड इथल्या नामांकित रुग्णालयात ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करू लागली होती. एक दिवस तिनं या सरोगसीच्या माध्यमातून आपल्या बाळाची वाट पाहणाऱ्या श्रीमंत जोडप्याला एक सरोगेट आई सापडल्याचे सांगितले. तसंच आयव्हीएफ प्रक्रियाही यशस्वी झाल्याचं सांगितलं. यामुळे अतिशय आनंदित झालेलं ते जोडपं आतुरतेनं आपल्या बाळाची वाट पाहू लागलं. मॅगी बनवणाऱ्या Nestle चा धक्कादायक रिपोर्ट आला समोर, खातानाही विचार कराल फ्लॅशबॅक 3: बेंगळुरू (मे, 2020) दरम्यान, रश्मी बेंगळुरुच्या विविध भागात सरकारी रुग्णालयात (Government Hospitals) फिरली आणि काही कर्मचार्‍यांशी तिनं मैत्री केली. या रुग्णालयामध्ये कधी कोणाची प्रसुती होणार आहे आणि आई-वडील कोण आहेत याची ती चौकशी करत होती. अखेर तिने चामराजपेट इथल्या सिरसी सर्कलजवळील बीबीएमपी (BBMP) हॉस्पिटलवर आपलं लक्ष केंद्रित केलं. इथं जास्त सुरक्षाव्यवस्था नाही. 29  मे रोजी रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी रश्मीला सांगितलं की,  आज सकाळी आंध्र प्रदेशातून आलेल्या नावेद पाशा आणि हुस्ना बानो या मजूर जोडप्याला निरोगी मुलगा झाला आहे. दरम्यान, एका डॉक्टरनं हुस्ना बानो हिला एक गोळी दिली आणि ती निघून गेली. त्याचवेळी तिचा पती नावेद पाशा आपल्या बहिणीला घरी सोडण्यासाठी हॉस्पिटलमधून बाहेर पडला होता. गोळी घेतल्यानंतर थोड्याच वेळात हुस्ना बानो झोपी गेली, ते बघून रश्मी ताबडतोब तिथं पोहोचली. तिनं बाळाला उचललं आणि तिथून पळून गेली. नंतर ती विजयनगरमधील एका मित्राच्या घरी गेली तिथं तिनं त्या उत्तर कर्नाटकातील श्रीमंत जोडप्याला येण्यास सांगितलं होतं. रश्मीनं ते बाळ त्या जोडप्याच्या हवाली केलं आणि त्यांच्याकडून 14.5 लाख रुपये घेऊन ती निघून गेली. या सगळ्या प्रकाराविषयी काहीच माहिती नसलेलं ते जोडपं अतिशय आनंदात आपल्या बाळाला घेऊन घरी गेलं. इकडे, बीबीएमपी हॉस्पिटलमधून मूल हरवल्याची बातमी आगीसारखी पसरली. पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये एक महिला बाळाला घेऊन जाताना दिसली. पण तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. तरीही कॅमेर्‍याच्या फुटेजमधून दिसणाऱ्या चेहऱ्याची वैशिष्ट्ये आणि आईने दिलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी त्या महिलेचं स्केच तयार करून घेतलं आणि ते सगळीकडे पाठवलं; पण कुठेच काही थांगपत्ता लागला नाही. अत्यंत उत्कंठावर्धक तपास : या प्रकरणात बाळाच्या आईपासून ते आरोपीपर्यंत महिलांचा सहभाग अधिक असल्यानं हे प्रकरण बसवनगुडी महिला पोलीस ठाण्याकडे (Basavangudi, Ladies Police Station)  सोपवण्यात आलं. तातडीनं या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी 20 अन्वेषकांची एक विशेष टीम तयार करण्यात आली. या टीमने आपल्या कामाला सुरुवात केली. हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांची चौकशी करून सर्वात जवळच्या टॉवर रेंजशी जोडलेल्या सर्व सेल फोनचे नंबर जमा केले. तब्बल 35 हजार फोन नंबर होते. त्याची वर्गवारी करण्याचं किचकट काम सुरू करण्यात आलं. त्यातून 600 संशयित फोन वेगळे करण्यात आले. त्या सर्व 600 लोकांचे फोटो आणि इतर माहिती गोळा करण्यात आली. यापैकी एक फोटो पोलिसांनी तयार करून घेतलेल्या स्केचशी जुळला आणि ही टीम त्या महिलेकडे पोहोचली. याबाबत माहिती देताना बेंगळुरू दक्षिणचे डीसीपी हरीश पांडे म्हणाले, ‘रश्मी नावाच्या या मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या महिलेकडे एमबीबीएसची पदवी नाही; मात्र तिचं म्हणणं आहे, तिनं मानसशास्त्रात एमडी केलं आहे. अद्याप त्याची पडताळणी केलेली नाही. बेंगळुरुच्या विजयनगरमधील रहिवासी असून, तिला सव्वा महिन्याची मुलगी आहे. तिच्या नवऱ्याला व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागला आणि तिच्यावर 4 ते 5 लाख रुपयांचं शैक्षणिक कर्ज होतं. त्यामुळे तिनं हा प्रकार केला. तिनी उत्तर कर्नाटकमधील त्या दाम्पत्याकडून घेतलेल्या पैशातून सर्व कर्जे फेडली आणि पतीला व्यवसाय नव्यानं सुरू करण्यास मदतही केली.’ पोलिसांनी त्या जोडप्याला शोधून काढलं, ते त्या बाळाची चांगली काळजी घेत होते. ‘आता बाळाची डीएनए चाचणी केल्यानंतरच त्याचे खरे आई-बाप कोण याची पुष्टी होईल. रश्मीने सरोगेसीची कहाणीही तपास पथकाला सांगितली. त्या उत्तर कर्नाटकातील जोडप्याला पोलीस स्टेशनमध्ये आणून सखोल चौकशी केल्यानंतर हे सर्व सत्य उघड झालं, असं पोलिसांनी सांगितलं. ‘या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी रुग्णालयातील प्रत्येक व्यक्तीसह सुमारे 800 संशयितांची चौकशी केली आहे. त्यात रुग्णालयातून तिला घेऊन जाणाऱ्या ड्रायव्हरचाही समावेश होता. सीसीटीव्ही फुटेज अगदी बारकाईनं तपासल्यानंतर आम्ही त्या महिलेला ताब्यात घेतलं. आधीच्या तपास अधिकाऱ्यांनीही या पथकाला महत्त्वाचा डेटा सोपवला होता आणि त्याचीही मोठी मदत झाली, असं डीसीपी हरीश पांडे यांनी सांगितलं.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Baby kidnap, Crime news

पुढील बातम्या