मुंबई, 19 फेब्रुवारी : मुंबईत एक शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका प्रतिष्ठीत शाळेतील मुख्याध्यापकाने 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. होस्टेलवर राहणाऱ्या 14 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली. दरम्यान आरोपीचे वय 65 असल्याने नातीच्या वयाच्या मुलीवर अत्याचार केल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 65 वर्षीय नराधम आरोपीने मुलीला या घटनेबाबत कोणाशीही बोलू नकोस, अन्यथा तुझे आयुष्य उद्ध्वस्त करू अशी धमकी दिली होती. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने आम्हाला सांगितले की, धमकीनंतर ती घाबरली होती आणि त्यामुळेच या घटनेची तक्रार कोणालाही करता आली नाही.
हे ही वाचा : लग्नाला जाण्यापासून रोखल्यावर पत्नीने दिला जीव, पतीनेही उचलले भयानक पाऊल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणीला आपल्या केबिनमध्ये बोलावून तिच्याशी गैरवर्तन करायचा. शाळेला लागूनच वसतिगृह असल्याने, मुख्याध्यापकांकडून अशा प्रकारे वारंवार छळ केला जात असल्याची माहिती आहे.
दरम्यान याबाबत पोलीस शाळेत जात तेथे राहणाऱ्या सर्व विद्यार्थिनींची चौकशी ही करत आहेत. नोव्हेंबर 2022 च्या पहिल्या आठवड्यापासून मुख्याध्यापक 7 वीत शिकणाऱ्या मुलीवर लैंगिक अत्याचार करत होते. मुलीची लहान बहीण आणि लहान भाऊ देखील त्याच शाळेत शिकतात आणि त्याच वसतिगृहात राहतात. परंतु मुख्याध्यापकाच्या धाकामुळे ती मुलगी घाबरत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
आम्ही त्यांच्याशी आणि वसतिगृहात राहणाऱ्या इतर 22 विद्यार्थ्यांशीही बोलणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान या अमानूष छळाविषयी त्या मुलीने आई-वडिलांना भेटल्यावर घटनेची माहिती दिली. त्यानंतर पालकांनी पोलिसांकडे संपर्क साधला.
हे ही वाचा : 3 वर्षीय अमोघला बरं करण्यासाठी देवाच्या दारात घेऊन गेले पण चेंगराचेंगरीत झाला शेवट, धक्कादायक व्हिडीओ
पालकांच्या तक्रारीच्या आधारे, मुख्याध्यापकांविरुद्ध लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा, 2012 आणि भारतीय दंड संहितेच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्याध्यापकालाही अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करणार आहोत, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.