जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / गर्भवती पत्नीला टोचले HIV बाधित इंजेक्शन! घटस्फोटासाठी नवऱ्याचं संतापजनक कृत्य

गर्भवती पत्नीला टोचले HIV बाधित इंजेक्शन! घटस्फोटासाठी नवऱ्याचं संतापजनक कृत्य

गर्भवती पत्नीला टोचले HIV बाधित इंजेक्शन! घटस्फोटासाठी नवऱ्याचं संतापजनक कृत्य

पतीला पत्नीपासून घटस्फोट हवा होता. त्यासाठी पतीला काही ठोस कारण हवे होते.

  • -MIN READ Andhra Pradesh
  • Last Updated :

अमरावती, 19 डिसेंबर : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. त्याचबरोबर अनैतिक संबंधातून हत्या आणि कौटुंबिक वादातून घटस्फोटाच्याही घटना समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एम.चरण असे आरोपीचे नाव आहे. पतीला पत्नीपासून घटस्फोट हवा होता. त्यासाठी पतीला काही ठोस कारण हवे होते. त्यामुळे त्या पुरुषाला वाटले की जर आपल्या पत्नीला एचआयव्ही झाला तर तो तिच्यापासून घटस्फोट घेऊ शकतो. यामुळे आरोपी पतीने यानुसार कट आखला आणि आपल्या गर्भवती पत्नीला एचआयव्ही बाधित इंजेक्शन दिले. हे धक्कादायक पाऊल उचलूनही तो पत्नी थांबला नाही. त्याने आपल्या पत्नीला एचआयव्ही पॉझिटिव्ह बनवले. हे प्रकरण आंध्र प्रदेशातील ताडेपल्ली येथील आले. घटस्फोटाचे कारण शोधण्यासाठी एका व्यक्तीने कथितपणे आपल्या गर्भवती पत्नीला एचआयव्ही बाधित रक्ताचे इंजेक्शन दिले. ताडेपल्ली पोलिसांनी एम.चरणला त्याच्या पत्नीने तक्रार दिल्यानंतर अटक केली. महिलेने सांगितले की, तिच्या पतीने क्वॅकच्या मदतीने तिला एचआयव्ही संक्रमित रक्ताचे इंजेक्शन दिले होते. यादरम्यान, तिला आपल्या पतीने रचलेल्या कटाबाबत माहिती नव्हती. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिचा पती चरण तिच्याशी घटस्फोट घेण्यासाठी ठोस कारण शोधत होता. त्यामुळे त्याने एक कट आखला आणि त्या आखलेल्या कटानुसार तो तिला एका डॉक्टरकडे घेऊन गेला. यादरम्यान, ती गर्भवती होती आणि गर्भधारणेदरम्यान आरोग्य चांगले राहावे, यासाठी तिला हे इंजेक्शन देण्यात आल्याचे तिला सांगण्यात आले. मात्र, यानंतर एका रुग्णालयात आरोग्य तपासणी दरम्यान, ती एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे तिला समज्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकली, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. हेही वाचा -  मृतदेहाचे 20 तुकडे करण्यासाठी 20 हजारांत सौदा, पोलिसांना अजूनही सापडत नाही शीर! तिचा पती हुंड्यासाठी छळ करत होता आणि मुलाला जन्म देण्यास भाग पाडत होता, असा आरोप पीडितेने केला आहे. या जोडप्याला एक मुलगी आहे. पोलीस आरोपी चरणची चौकशी करत आहेत. तसेच पीडितेच्या वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याचवेळी या घटनेने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. नवर्‍याच्या या कृत्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात