मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Pooja Chavhan Death: भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल; पूजासह समाजाची बदनामी केल्याचा आरोप

Pooja Chavhan Death: भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल; पूजासह समाजाची बदनामी केल्याचा आरोप

Pooja chavhan death case: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भाजप नेत्या  चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Published by:  News18 Desk

बीड, 03 मार्च: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढलेल्या पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात (Pooja Chavhan Death Case) अनेक आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या आहेत. या मुद्द्यावरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारसमोरही (Mahavikas Aghadi Govt) अडचणी निर्माण झाल्या. मात्र शिवसेनेचे आमदार संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने हे प्रकरण काही काळापुरतं शांत झालं. पण या प्रकरणात आता पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात भाजप नेत्या चित्रा वाघ (BJP Leader Chitra Wagh) यांच्याविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चित्रा वाघ यांनी हे प्रकरण लावून धरलं होतं. तसेच वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आता या प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागलं असून पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात, पूजाची आणि बंजारा समाजाची बदनामी केल्याचा ठपका चित्रा वाघ यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात आणखी एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. यामध्ये नगरसेवक धनराज घोगरे यांचंही नाव आहे. ही तक्रार शिवसेना महिला जिल्हा प्रमुख संगीता चव्हाण आणि कृष्णा राठोड  यांनी केली आहे. पूजासह समाजाची बदनामी केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे या प्रकरणाला आणखी वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा - चित्रा वाघ पुन्हा अडचणीत, पती किशोर वाघ यांच्याविरोधात ACBने दाखल केला गुन्हा

दरम्यान, महाराष्ट्र विधान सभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारसाठी दुखती नस बनलं होतं. अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारला घेरण्याची सर्व तयारी विरोधी पक्षाने केली होती. मात्र ऐन अधिवेशनाच्या तोंडावर संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याने या प्रकरणात राज्य सरकार वादाच्या भोवऱ्यातून काहीसं बचावलं आहे. पण पूजा चव्हाण यांच्या नातेवाईक शांताताई राठोड (Shantatai Rathod) यांनी पूजा चव्हाण प्रकरणात न्यायमिळेपर्यंत लढा देणार असल्याचं म्हटलं आहे.

First published:

Tags: Beed news, Chitra wagh, Pooja Chavan