Home /News /crime /

पूजा चव्हाणच्या मृत्यूचे गूढ पुन्हा वाढलं, बँकेनं दिली नवी माहिती

पूजा चव्हाणच्या मृत्यूचे गूढ पुन्हा वाढलं, बँकेनं दिली नवी माहिती

डिसेंबर 2018 मध्ये पूजाने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत 13 लाख 50 हजाराचे कर्ज मंजूर झाले होते.

बीड, 15 फेब्रुवारी : पूजा चव्हाण (pooja chavan)आत्महत्या प्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे. ज्या बँकेकडून कुक्कुटपालनासाठी कर्ज घेतले होते, त्या स्टेट बँकेनं पूजाला कर्जाबाबत कोणताही त्रास देण्यात आला नाही, असा खुलासा केला आहे. बँकेचं कर्ज असल्याने पूजा तणावात होती, बँकेकडून सतत कर्जाबाबत विचारणा होत होती. त्यामुळेच तिला चक्कर आली आणि खाली पडून तिचा मृत्यू झाला असावा, असा दावा मयत पूजा चव्हाणच्या वडील लहू चव्हाण यांनी  केला होता. मात्र बँकेतून पूजाने घेतलेल्या कर्जाबाबत कसलाही त्रास देण्यात आला नसल्याचे समोर आले आहे. डिसेंबर 2018 मध्ये पूजाने जिल्हा उद्योग केंद्रामार्फत 13 लाख 50 हजाराचे कर्ज मंजूर झाले होते. परळी येथील गांधी मार्केट मधील स्टेट बँकेने हे कर्ज दिले होते. आतापर्यंत 35 हजार 500 रुपयाप्रमाणे 12 हफ्ते पूजाने भरले आहेत. या कर्जासाठी बँकेकडून कसलीही विचारणा झाली नसल्याने बँक अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, याबाबत बँक अधिकाऱ्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे. काय म्हणाले होते पूजाचे वडील? माझ्या मुलीची बदनामी थांबवा असं आवाहन पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी केलं होतं.  पोल्ट्रीमध्ये झालेल्या नुकसानीमुळं पूजा काहीशी तणावात असल्याचा खुलासा तिच्या वडिलांनी केला आहे. तसंच तिच्यावर मानसिक उपचारही सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. पूजाच्या वडिलांनी मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप करणंही टाळलं. पूजावर सुरू होते मानसिक उपचार' पूजावर गेल्या काही दिवसांपासून मानसिक उपचार सुरू होते, अशी माहिती तिच्या वडिलांनी दिली आहे. तसंच या प्रकरणावरून शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याबाबत होत असलेल्या चर्चांवरही उत्तर दिलं आहे. 'आमचा कोणावरही संशय नाही. संजय राठोडसोबत तिचं नाव जोडू नका. पूजाचे कोणासोबतही संबंध नाही. कुटुंबावर कोणाचाही दबाव नाही,' असंही पूजा चव्हाण हिच्या वडिलांनी म्हटलं आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Beed, Crime, Financial debt, Maharashtra, Pooja Chavan, SBI Bank News

पुढील बातम्या