Home /News /crime /

मध्यरात्रीची दारु पार्टी लक्ष्मीपुत्रांना भोवली, पोलिसांमुळे निघाली पायी वरात !

मध्यरात्रीची दारु पार्टी लक्ष्मीपुत्रांना भोवली, पोलिसांमुळे निघाली पायी वरात !

मध्यरात्रीपर्यंत दारुची पार्टी करून गाड्या चालवणाऱ्या श्रीमंत (Police takes action on rich boys in drunk and drive case) तरुणांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली

    इंदूर, 26 सप्टेंबर : मध्यरात्रीपर्यंत दारुची पार्टी करून गाड्या चालवणाऱ्या श्रीमंत (Police takes action on rich boys in drunk and drive case) तरुणांना पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली. कायद्याची कुठलाही भीती नसणाऱ्या (No fear of law) या लक्ष्मीपुत्रांनी दारू पिऊन रस्त्याने महागड्या गाड्या चालवायला सुरुवात केली. पोलिसांनी जेव्हा ही गाडी थांबवली आणि गाडी चालवणाऱ्याची टेस्ट केली, तेव्हा ड्रायव्हरसह गाडीतील सर्वजण दारुच्या नशेत धुंद असल्याचं पोलिसांना आढळलं. पोलिसांनी रोखल्या गाड्या इंदूर पोलिसांनी तपासणीसाठी गाड्या थांबवल्याचा या तरुणांना चांगलाच राग आला. त्यातील एका तरुणीने गाडीतून खाली उतरत पोलिसांना आपली ओळख सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी ब्रेथ ऍनालाजरचा वापर करत गाडीचालकाच्या श्वासाचे नमुने घेत कारवाईला सुरुवात केली. वेगवेगळ्या 10 गाड्यांवर पोलिसांनी कारवाई करत दारु पिऊन गाडी चालवल्याचे गुन्हे नोंदवले. गाड्या केल्या जप्त या तरुणांकडे अत्यंत महागड्या गाड्या होत्या. या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. गाड्यांमध्ये दारुच्या बाटल्या, ग्लास आणि इतर काही खाद्यपदार्थ होते. पोलिसांनी गाड्याच जप्त केल्यामुळे यातील काहीजणांनी ओळखीतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न केला. मात्र कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने कुणालाही न जुमानता आपलं कर्तव्य पार पाडलं. गाड्या जप्त केल्यामुळे नशेच्या अधीन झालेल्या या तरुणांना चालत घरी जाण्याशिवाय कुठलाही पर्याय उरला नाही. धडपडत, भेलकांडत या तरुणःतरुणींची वरात घराकडे चालली होती. रात्रीची वेळ असल्यामुळे रस्त्यात गर्दी नव्हती. मात्र काही तुरळक प्रवाशांनी हा प्रकार पाहून आश्चर्य व्यक्त केलं. हे वाचा - विकृत! बहीण घराबाहेर पडत असल्याचा सणकी भावाला राग, कात्रीने वार करून केलं जखमी अपघाताचा धोका दारु पिऊन गाडी चालवणं हा अपराध आहे. मद्यपी चालकामुळे मोठे आणि गंभीर अपघात झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. तरीही सुशिक्षित तरुण केवळ आपल्या श्रीमंतीच्या आणि ओळखीच्या जोरावर नियम मोडताना दिसतात. पोलिसांनी अशा तरुणांना अद्दल घडवली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Drunk boy, Indore

    पुढील बातम्या