रांची 22 मे : लग्नाचं एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. झारखंडमधील पलामूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली. यात एका 12 वर्षांच्या मुलीचा विवाह 45 वर्षाच्या व्यक्तीसोबत होत होता. तेव्हाच कोणीतरी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस, सीडब्ल्यूसी आणि चाइल्डलाइन यांनी संयुक्तपणे कारवाई केली. घटनास्थळी पोहोचताच हा विवाह थांबवण्यात आला.
पोलिसांनी नवरदेव बनून आलेल्या व्यक्तीला अटक केली आहे. त्याचवेळी मुलीला बालिकागृहात पाठवण्यात आलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या नात्याला मुलीच्या कुटुंबीयांनीच संमती दिली होती. त्यांचीही पोलीस चौकशी करत आहेत.
आनंदात केलेला गोळीबार दुःखात बदलला; लग्नातच चिमुकलीचा भयानक शेवट, 5 जखमी
मिळालेल्या माहितीनुसार, रेडमा येथील ठाकूरबारी मंदिरात एका 12 वर्षीय मुलीचे 45 वर्षीय व्यक्तीसोबत लग्न होत असल्याची माहिती चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक 1098 वर कोणीतरी दिली होती. पोलिसांनाही याबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलीस, सीडब्ल्यूसी आणि चाइल्डलाइनचे लोक त्या ठिकाणी पोहोचले जिथे विवाह सोहळा सुरू होता.
पोलिसांना पाहताच लग्नात उपस्थित लोक घाबरले. पोलिसांनी आधी नवरदेवाला पकडले. तो पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कनकेकला येथील रहिवासी आहे. त्याची आणि मुलीच्या कुटुंबीयांची अद्याप चौकशी सुरू आहे. मुलीला बालिकागृहात पाठवण्यात आले आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.
यापूर्वी मध्य प्रदेशातील आगर माळवा येथूनही असेच एक प्रकरण समोर आले होते. येथील सुसनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेहंदी गावात एक महिला आपल्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून देत होती. मात्र तिच्या पतीने याबाबत पोलिसांत तक्रार केली. पत्नीने बळजबरीने अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याचे सांगितले.
माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा ती महिला स्वत: वधू म्हणून पुढे आली आणि तिने स्वतः लग्न करत असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांसमोर तिची हुशारी कामी आली नाही. यानंतर पोलिसांनी महिला, तिचा भाऊ आणि वडिलांना पोलीस ठाण्यात नेले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.