मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

श्रीमंतांच्या पार्टीवर पोलिसांची धाड, उडाली तरुणांची भंबेरी, दादागिरी करणाऱ्यांना दाखवला इंगा

श्रीमंतांच्या पार्टीवर पोलिसांची धाड, उडाली तरुणांची भंबेरी, दादागिरी करणाऱ्यांना दाखवला इंगा

 श्रीमंत घरातील अनेक तरुण तरूणी तिथं पार्टी करत होते. पार्टीत हुक्का वाटला जात होता आणि पूर्णतः नशेच्या आहारी गेलेले तरुण पोलिसांशीच उर्मटपणे वागत असल्याचं चित्र दिसलं.

  • Published by:  desk news

रायपूर, 25 जुलै : कोरोना काळात पब (Pub) आणि कॅफे (Cafe) सुरू ठेवण्यासाठी घालून दिलेली वेळेची मर्यादा (Time Limit) ओलांडणाऱ्या आस्थापनांवर पोलिसांनी कारवाई (Police Action) केली आहे. यापैकी एका बारमध्ये पोलीस पोहोचले असता तिथला नजारा बघून त्यांनाही धक्का बसला. श्रीमंत घरातील अनेक तरुण तरूणी तिथं पार्टी करत होते. पार्टीत हुक्का वाटला जात होता आणि पूर्णतः नशेच्या आहारी गेलेले तरुण पोलिसांशीच उर्मटपणे वागत असल्याचं चित्र दिसलं.

नेमकं काय घडलं?

रायपूरमध्ये (Raipur) रात्री 10 वाजेपर्यंत बार सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी रात्री 12 वाजेपर्यंत बार सुरु असल्याचं चित्र आहे. अशा बारवर कारवाई करण्याची मोहिम पोलिसांनी हाती घेतली आहे. रायपूरमधील तेलीबांधा परिसरात असणाऱ्या बारमध्ये पोलीस पोहोचले, तेव्हा तिथला नजारा पाहून पोलीसच अचंबित झाले. नशेच्या आहारी गेलेले तरुण आणि तरुणी दारु पार्टीसोबत अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचं चित्र पोलिसांना दिसलं.

अऩेकांची भंबेरी

या पार्टीत पोलीस आल्याचं पाहून अनेकांची भंबेरी उडाली. काहीजण लिफ्टमधून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. काहींनी आपला चेहरा लपवला, तर काहींनी चक्क भिंतीकडं तोंड करून पोलिसांना आपला चेहरा दिसणार नाही, याची खबरदारी घ्यायला सुरुवात केली. काहीजणांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील काहीजण त्यात यशस्वीदेखील झाले.

पोलिसांवर दादागिरी

या पार्टीत अनेक श्रीमंत तरुण होते आणि त्यातील काहींनी पोलिसांना धमकी देण्याचा प्रयत्न केला. आपल्या वडिलांची किंवा इतर कुणाची नावं सांगत पोलिसांना परत जाण्याची धमकी काहीजण देऊ लागले. मात्र पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवताच त्यांची गुर्मी उतरली आणि ते माफी मागू लागले.

हे वाचा -बिग बॉस फेम अभिनेत्रीचा भीषण कार अपघात; घटनेत मैत्रीणीचा जागीच मृत्यू

पोलिसांनी या प्रकरणी कागदपत्रांची छाननी केली असता बार मालकाकडे मद्यव्यवसाय करण्यासाठी आवश्यक ती सर्व कागदपत्रं असल्याचं सांगितलं आहे. मात्र वेळेची मर्यादा न पाळल्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे.

First published:

Tags: Chattisgarh, Police action, Raipur news