पुणे, 29 मार्च: पुण्यातील (Pune) आंबेगाव परिसरात सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश (Sex racket exposed) केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी करत पोलिसांनी दोघांना अटक (2 arrested) केली आहे. तर वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या दोन तरुणींची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हॉटेल मालकासह त्याच्या अन्य तीन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पीडित तरुणी ह्या मूळच्या उत्तर प्रदेशातील रहिवासी असून त्यांना नोकरीच्या बहाण्याने (Lure of job) पुण्यात आणण्यात आलं होतं.
विपुल बाबासाहेब बेलदरे (36, आंबेगाव) आणि विक्रम करण शोनार (24, रा. ब्रम्हा लॉज, आंबेगाव) असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहे. तर पोलिसांनी संजय प्रसाद महतो, केदार मंडल आणि त्याच्या अन्य एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपी मागील बऱ्याच दिवसांपासून पुणे-मुंबई महामार्गावरील ब्रम्हा लॉजवर सेक्स रॅकेट चालवत होते. परराज्यातील तरुणींकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता.
हेही वाचा-एकतर्फी प्रेमातून आयटी इंजिनिअरची हद्द पार; मुंबईच्या गायिकेच्या नाकीनऊ
याबाबत अधिक माहिती देताना भारती विद्यापीठ पोलिसांनी सांगितलं की, पुण्याच्या आंबेगाव परिसरातील ब्रम्हा पॅलेस लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून सेक्स रॅकेटबाबत पाठपुरावा केला. खात्री पटल्यानंतर पोलीस पथकाकडून ब्रम्हा पॅलेस लॉजवर पोलिसांनी छापेमारी केली आहे. यावेळी पोलिसांनी दोन दलालांना अटक केली असून दोन तरुणींची सुटका केली आहे.
हेही वाचा-प्रेयसीनं नकार दिला म्हणून तिच्या भावावर उगवला सूड, भयंकर स्थितीत आढळला मृतदेह
आरोपी विपुल बेलदरे आणि विक्रम शोनार दोघं उत्तर प्रदेशातील 20 आणि 21 वर्षीय तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेत होते. आरोपींनी पीडित तरुणींना नोकरीच्या आमिषाने पुण्यात आणलं होतं. संबंधित तरुणींना हिंजवडी येथील हॉटेल कम्फर्ट इन मध्ये ठेवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. या प्रकरणी पोलिसांनी एकूण पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच वेश्याव्यवसायात अडकलेल्या दोन्ही तरुणींची सुटका केली आहे. या घटनेचा पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Pune, Sex racket