पुणे, 28 मार्च: पुण्यातील (Pune) बावधन परिसरात एका पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीनं आणि सासूने घराशेजारी शेजारी राहणाऱ्या एका महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. आरोपी महिलांनी दादागिरी करत फिर्यादी महिलेला आणि तिच्या सासूला बेदम मारहाण ( police officers wife and mother in law beat neighbour woman) केली आहे. आरोपींनी दगड मारून फिर्यादी महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी हिंजवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR lodged) करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीनच्या सुमारास घडली आहे. या घटनेचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला या मुंबई येथील प्रोबेशनरी पोलीस उपनिरीक्षकाची बायको आणि सासू आहेत. संबंधित पोलीस अधिकाऱ्याची बायको अलीकडेच आपल्या आईकडे पुण्यातील बावधन याठिकाणी आली होती. तिच्या वडिलांच्या नात्यातील एका कुटुंबीयांसोबत जागेच्या बांधकामावरून वाद आहे. या वादातून फिर्यादी महिलेच्या सासू आरोपींच्या घरी गेल्या होत्या. आमच्या जागेत बांधकाम करू नका, असं फिर्यादीच्या सासूने आरोपी मायलेकींना सांगितलं. हेही वाचा- वास्तूशांतीनंतर दुसऱ्याच दिवशी मृत्यूनं ठोठावलं दार;नवीन घराचं स्वप्न हवेत विरलं यानंतर वाद वाढत गेल्यानंतर आरोपी महिलांनी फिर्यादीच्या सासूला मारहाण केली. यावेळी फिर्यादीचे सासरे आणि पती भांडण सोडवण्यासाठी गेले असता, आरोपी महिलांनाही त्यांनाही ढकलून दिलं. या मारहाणीनंतर फिर्यादीच्या सासू आणि पती दोघंही हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी गेले. यावेळी फिर्यादी महिला आणि त्यांचे आजारी सासरे दोघेच घरी होते. याचा फायदा घेत आरोपी मायलेकी त्याठिकाणी आल्या आणि त्यांनी फिर्यादी महिलेला मारहाण केली आहे. हेही वाचा- विवाहित पुरुषासह मृतावस्थेत आढळली विधवा महिला, साताऱ्यातील खळबळजनक घटना आरोपींनी फिर्यादीला दगड मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने त्यांनी तो दगड हुकवला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. यानंतर आरोपी मायलेकींनी फिर्यादीला हाताने चापटी आणि बुक्क्यांनी मारहाण केली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेनं शनिवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी आरोपी मायलेकींवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.