मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /भर पोलीस चौकीत बलात्काराचा प्रयत्न, केले अनन्वित अत्याचार

भर पोलीस चौकीत बलात्काराचा प्रयत्न, केले अनन्वित अत्याचार

पोलिसांनी एका महिलेला पोलीस ठाण्यात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर अनेक अत्याचार केले

पोलिसांनी एका महिलेला पोलीस ठाण्यात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर अनेक अत्याचार केले

पोलिसांनी एका महिलेला पोलीस ठाण्यात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर अनेक अत्याचार केले

अहमदाबाद, 27 डिसेंबर: पोलिसांनीच (Police) एका महिलेवर (Woman) अत्याचार करत तिच्यावर पोलीस चौकीतच (Police Station) बलात्काराचा (Rape) प्रयत्न केल्याची घटना उघडकीला आली आहे. एका गुन्ह्याचा तपास करण्याच्या निमित्तानं पोलिसांनी एका विवाहित आदिवासी महिलेला पोलीस ठाण्यात आणलं आणि तिच्यावर अनेक प्रकारचे अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. या महिलेला पोलीस ठाण्यात झाडू मारायला लावला, त्यानंतर स्वयंपाक करायला लावला आणि भांडीदेखील घासायला लावली. त्यानंतर महिलेवर बलात्कार करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. या सर्व प्रकाराला वाचा फुटल्यानंतर पोलिसांनीच शहरातून पळ काढला.

काय आहे प्रकरण?

गुजरातमधील उदयपूरमध्ये पोलिसांचा राक्षसी चेहरा समोर आला आहे. एक साहाय्यक उपनिरीक्षक आणि पोलीस कॉन्स्टेबल यांनी एका प्रकरणात एक विवाहित महिला आणि तिच्या आईवडिलांना अटक केली. त्यांना रात्रभर पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं आणि त्यांच्याकडून अनेक कामं करवून घेतली. त्यांना स्वयंपाक करायला लावला आणि भांडीदेखील घासून घेतली धक्कादायक म्हणजे यावेळी एकही महिला पोलीस उपस्थित नव्हती. अशा परिस्थितीत कायदेशीर बाबींचं पालन न करता महिलेला अक्षरशः डांबून ठेवण्यात आलं. त्यानंतर हे दोन्ही पोलीस अधिकारी महिला आणि तिच्या आईवडिलांना घेऊन दोन दिवस गुजरातच्या वेगवेगळ्या भागात फिरत राहिले.

महिलेवर बलात्काराचा प्रयत्न

पोलीस कॉन्स्टेबलने महिलेवर बलात्कार करण्याचाही प्रयत्न केला. आईवडिलांना वेगळ्या खोलीत ठेवून महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, मात्र तरुणीच्या आईने आरडाओरडा करत मध्यस्थी करून मुलीला वाचवण्याचा प्रयत्न केला.

गावकऱ्यांचा हल्लाबोल

या घटनेची कल्पना गावकऱ्यांना मिळताच त्यांनी पोलीस ठाण्यात फोन करून याला आक्षेप घेतला. महिला पोलीस नसताना महिलेला रात्रभऱ ठाण्यात कसं ठेवलं, असा जाब विचारताच दोन्ही पोलीस अधिकारी हादरले आणि शहर सोडून पळाले.

हे वाचा- हरणांमुळे नवीन कोरोना विषाणू संसर्ग उद्भवण्याची शक्यता; शास्त्रज्ञांचा इशारा

कॉन्स्टेबलवर कारवाई

या घटनेची राज्यभर वाच्यता होऊ लागल्याचं पाहून साहाय्यक उपनिरीक्षक राजकुमार आणि पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र कुमार यांच्यावर कारवाई करण्यात आली असून जितेंद्र कुमारला निलंबित करण्यात आलं आहे. डीएसपी पातळीवरून या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Gujarat, Rape, Women