जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पोलिसच निघाला अमली पदार्थ तस्कर, 7 लाखांच्या गांजा तस्करीत वसई-विरारमधील पोलीस कर्मचारी अटकेत

पोलिसच निघाला अमली पदार्थ तस्कर, 7 लाखांच्या गांजा तस्करीत वसई-विरारमधील पोलीस कर्मचारी अटकेत

पोलिसच निघाला अमली पदार्थ तस्कर, लाखोंच्या गांजा तस्करीत वसईतील पोलीस कर्मचारी अटकेत

पोलिसच निघाला अमली पदार्थ तस्कर, लाखोंच्या गांजा तस्करीत वसईतील पोलीस कर्मचारी अटकेत

कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस नेहमीच कार्यरत असतात. मात्र, आता वसई-विरारमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गांजा तस्करी करणाऱ्या एका टोळीला पोलिसांनी अटक केली असून त्यात एका पोलीस कर्मचारीही आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वसई, 11 फेब्रुवारी : मुंबईत विक्रीसाठी 150 किलो गांजा (cannabis) घेऊन येणाऱ्या सहा आरोपींना अटक करण्यात छत्तीसगढ पोलिसांना (Chhatisgarh) यश आले आहे. या सहा आरोपींमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेला हा पोलीस कर्मचारी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय मुख्यालयात सेवेत असल्याची माहिती मिळत आहे. चक्क पोलीस कर्मचारीच गांजा तस्करी प्रकरणात अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. (Maharashtra Policeman arrested in smuggling of cannabis) पोलीस कर्मचारी अटकेत साजिद पठाण असं अटक करण्यात आलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. छत्तीसगढच्या बस्तर पोलिसांना महागड्या गाड्यातून गांजाची मोठ्याप्रमाणात तस्करी होणार असल्याची माहिती  मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छत्तीसगढ-ओडीसा सीमेवर गाड्यांच्या तपासणी करता सापळा रचला. यावेळी पोलिसांनी आरोपींना अटक केली. वाचा :  जिल्हा रुग्णालयात वॉर्ड बॉयनं नर्सच्या डोक्यात झाडली गोळी, धक्कादायक कारण समोर गांजाची किंमत लाखो रुपयांत अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 150 किलो गांजा जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींकडून हा गांजा जप्त केला असून त्यांच्या गाड्याही जप्त केल्या आहेत. बाजार भावानुसार जप्त केलेल्या गांज्याची किंमत 7 लाख 50 हजार इतकी आहे. जप्त करण्यात आलेला गांजा मुंबई परिसरात विक्री केला जाणार होता अशी माहिती समोर आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये अंकित जायसवाल, चांद पाशा यांचा समावेश असून हे दोन्ही आरोपी महाराष्ट्रातील निवासी आहेत. पोलिसांनी आणखी एका गाडीतून गांजासह आरोपींना अटक केली आहे. यामध्ये अजय पटेल, सूरज मौर्या, रितेश सिंग, साजिद पठाण यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला साजिद पठाण हा मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयात कार्यरत आहे. त्याने पोलीस आयुक्तालयात दोन दिवसांची सुट्टी घेतल्याची माहिती समोर आली आहे. या सुट्टीच्या काळात तो गांजा तस्करीसाठी गेला असल्याचं बोललं जात आहे. वाचा :  नागपूर हादरलं! महिलेला एकटं पाहून साधला डाव, दोघांनी मध्यरात्री दिल्या नरक यातना मुंबईत दरोडेखोरांना सिनेस्टाईल अटक दिवसाढवळ्यात घरफोडी करून किमती ऐवज लांबवणाऱ्या एका टोळीला मुंबई तील मालाड पोलिसांनी अटक केली आहे. मालाड पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून टोळीतील पाचही आरोपींना अटक केली आहे. संबंधित सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत. त्यामुळे आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांना चक्क romantic कपलचा वेश घ्यावा लागला आहे. तर काही पोलीस रिक्षाचालक, वेटरच्या वेशभूषेत सापळा टाकून बसले होते. भामट्यांनी घरातील टीव्ही, लॅपटॉपसह अन्य मौल्यवान वस्तू असा एकूण 40 लाखांचा मुद्देमाल लुटला होता. चोरीची ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलीसही चक्रावले होते. अखेर पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात