मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /प्रेयसीला धोका देऊन करत होता लग्न, मंडपातून पोहोचला थेट तुरुंगात

प्रेयसीला धोका देऊन करत होता लग्न, मंडपातून पोहोचला थेट तुरुंगात

प्रेयसीला धोका देऊन (Police arrested groom just before reaching marriage location) दुसऱ्याच तरुणीसोबत लग्न करण्याच्या बेतात असणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

प्रेयसीला धोका देऊन (Police arrested groom just before reaching marriage location) दुसऱ्याच तरुणीसोबत लग्न करण्याच्या बेतात असणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

प्रेयसीला धोका देऊन (Police arrested groom just before reaching marriage location) दुसऱ्याच तरुणीसोबत लग्न करण्याच्या बेतात असणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पटना, 22 नोव्हेंबर: प्रेयसीला धोका देऊन (Police arrested groom just before reaching marriage location) दुसऱ्याच तरुणीसोबत लग्न करण्याच्या बेतात असणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रेयसीसोबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध असलेल्या (Fake marriage promise and sexual harassment case) आणि तिला लग्नाचं वचन दिलेल्या प्रियकरानं अचानक आपला इरादा बदलत लपूनछपून लग्न करण्याचा निर्णय घेतला.

काय आहे प्रकरण?

बिहारमधील खगडियामध्ये एकाच शाळेत काम करणाऱ्या तरुणाचं त्याच्या सहकारी महिलेसोबत प्रेम जुळलं होतं. त्याने तिला लग्नासाठी प्रपोज केलं आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. या काळात त्यांच्यात शारीरिक संबंधदेखील प्रस्थापित झाले. मात्र काही काळानंतर तरुणाने या महिलेकडं पाठ फिरवत अरेंज मॅरेज करण्याचा निर्णय़ घेतला. आपल्याला हे लग्न करण्याची इच्छा नसून आपल्याला विसरून जा, असं या तरुणाने महिलेला सांगितलं. लग्नाचं वचन देऊन तरुणाने पाठ फिरवल्यामुळे तरुणीला जबर धक्का बसला.

तरुणीची पोलिसांत धाव

आपला प्रियकर आपल्याला कल्पना न देताच लपूनछपून लग्न करत असल्याची माहिती तरुणीला मिळाली. वेगळ्या गावात जाऊन आपल्या चुलत्यांच्या घरात लग्न करण्याचा बेत तरुणाने आखला होता. मात्र त्यापूर्वीच तरुणीने त्याच्याविरोधात लैंगिक शोषण केल्याची आणि लग्नाचं अमिष दाखवत बलात्कार केल्याची तक्रार पोलिसांत नोंदवली.

हे वाचा-'बिग बॉस मराठी 2' विजेत्याच्या गाडीला भीषण अपघात, अभिनेता गंभीर जखमी

लग्नात पोलिसांची एन्ट्री

लग्नाची सर्व तयारी झाली होती, पाहुणे मंडळी जमली होती, बँडबाजा सज्ज होता आणि काही वेळातच लग्न लागणार होतं. वरातीतून लग्नाच्या मंडपाकडे चाललेल्या नवरदेवाला मंडपात काही पोहोचता आलं नाही. त्याअगोदरच पोलिसांनी तिथं हजेरी लावली आणि त्याला अटक केली. नवरदेव मंडपात पोहोचण्याऐवजी थेट तुरुंगात पोहोचला. लग्नात पोलिसांनी प्रवेश केल्यामुळे वऱ्हाडी मंडळींचीही घाबरगुंडी उडाली आणि लोक सैरावैरा धावू लागले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. लवकरच सर्व बाबी तपासून कायदेशीर कारवाई केली जाईल, असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.

First published:
top videos

    Tags: Girlfriend, Marriage, Sexual harrasment