Home /News /crime /

धक्कादायक! भक्तांना लघवी आणि कफ पाजून उपचार करायचा अघोरी बाबा; छाप्यात आढळले 11 मृतदेह

धक्कादायक! भक्तांना लघवी आणि कफ पाजून उपचार करायचा अघोरी बाबा; छाप्यात आढळले 11 मृतदेह

पोलिसांनी सांगितलं की, हा बाबा चार वर्षांपासून दुर्गम गावातील जंगलात आपला पंथ चालवत असे, त्यामुळे त्याचा कधीच पत्ता लागला नाही. थवी आपल्या डझनभर शिष्यांसह जंगलात राहत होता. छाप्यात पोलिसांनी 11 मृतदेह ताब्यात घेतले आहेत

नवी दिल्ली 11 मे : अंधश्रद्धेला बळी पाडून बुवाबाजी करणारे अनेक कथित संत, बाबा आजकाल पाहायला मिळतात. काहींच्या अघोरी आणि घृणास्पद कृत्यांमुळे देश हादरल्याच्याही घटना आपण पाहिल्या असतील. असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे. यात एक बाबा त्याच्या अनुयायांना त्याची लघवी (Urine) पिण्यासाठी द्यायचा आणि कफ चेहऱ्यावर लावायला देऊन उपचार करायचा. या प्रकरणातील आरोपी बाबाला अटक करण्यात आली आहे. थायलंडमध्ये (Thailand) छैयफुम प्रांतातून पोलिसांनी एका विचित्र कथित बाबाला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा बाबा एक पंथ चालवतो, ज्यामध्ये त्याचे अनुयायी मृतदेहांची पूजा करत असत. बाबा भक्तांना लघवी प्यायला देत आणि कफ खाण्यास सांगत. पोलिसांनी या बाबाला जंगलातून अटक केली असून तिथे 11 मृतदेह सापडले आहेत. थवी नानारा (75) असं या बाबाचं नाव आहे. कोरोना संकटात पत्नीचे दागिने विकून जावेदने ऑटोला बनवलं Ambulance, आता बलात्काराचा गुन्हा दाखल या बाबाचा कॅम्प घनदाट जंगलात होता. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तिथे छापा टाकला. जेव्हा पोलीस थवी नानाराला अटक करण्यासाठी गेले तेव्हा त्यांच्या अनुयायांमध्ये झटापट झाली आणि त्यांना घेऊन जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न भक्तांनी केला. त्यावेळी तिथलं दृश्य पाहून पोलीसही हादरले होते. नवभारत टाईम्सने या संदर्भात वृत्त दिलं आहे. 53 वर्षीय खून गेंजिरा हिने अधिकाऱ्यांकडे तक्रार केली की तिच्या आईला घरी परत येऊ दिलं जात नाही. ती म्हणाली, ‘मी आईला भेटायला गेले होते. मी तिथे पाहिलं की एक महिला लोकांना ड्रेस कोडमध्ये राहण्यास सांगत होती. तिथे जाण्यापूर्वी प्रत्येकाला शूज काढावे लागायचे. माझ्यासाठी सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे माझ्या आईला त्या अवस्थेत पाहाणं. मी माझ्या आईला पाहिलं तेव्हा ती बाबांचा कफ चेहऱ्यावर लावत होती. ती त्याची थुंकी पीत होती. तिथे बाबांच्या 11 भक्तांचे मृतदेह (Dead Body) होते. माझी आईसुद्धा म्हणाली की मी मेल्यानंतर माझा मृतदेह तिथेच सोडावा. तिथे कोविड-19 चे कोणतेही नियम पाळले जात नव्हते.’ बाबांच्या भक्तांनी सांगितलं की, त्यांना कोरोना स्पर्शदेखील करू शकत नाही. पोलिसांनी या महिलेच्या तक्रारीच्या आधारे तिथे छापा टाकला. पतीने जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल होणार? सर्वोच्च न्यायालय करणार पुनरावलोकन पोलिसांनी सांगितलं की, हा बाबा चार वर्षांपासून दुर्गम गावातील जंगलात आपला पंथ चालवत असे, त्यामुळे त्याचा कधीच पत्ता लागला नाही. थवी आपल्या डझनभर शिष्यांसह जंगलात राहत होता. छाप्यात पोलिसांनी 11 मृतदेह ताब्यात घेतले आहेत, हे सर्व मृतदेह घराभोवती विखुरलेले होते. हे मृतदेह त्यांच्याच अनुयायांचे असल्याचं म्हटलं जातं आहे. या मृतदेहातून गेलेले आत्मे स्वर्गात परत येण्याची वाट पाहत होते म्हणून त्यांचे मृतदेह साठवले होते, असं या बाबाने म्हटलंय. छाप्याच्या वेळी अनुयायांनी सांगितलं की, बाबा आपल्या लघवी आणि कफाने रोग बरे करतात. दरम्यान, घराबाहेर पाच शवपेट्यांमध्ये मृतदेह सापडले असून त्यात लहान मुलाच्या मृतदेहाचाही समावेश आहे. सर्व शवपेटींमध्ये छिद्रे पाडण्यात आली होती जेणेकरून शरीरातून बाहेर पडणारा द्रव बाहेर वाहू शकेल. थवीने अधिकाऱ्यांना सांगितलं की त्यांचे सर्व शिष्य त्यांच्या स्वेच्छेने येथे आहेत. त्याने कोणालाही येथे राहण्यास भाग पाडले नाही. दरम्यान, पोलिसांनी या विकृत बाबाला अटक केली असून, त्याला कोर्टाने जामीन नाकारला आहे.
First published:

Tags: Crime news, Shocking news

पुढील बातम्या