मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /योगी आदित्यनाथांचं नाव वापरून लाखोंचा अपहार, पत्रकाराचा 'झोल' वाचून बसेल धक्का

योगी आदित्यनाथांचं नाव वापरून लाखोंचा अपहार, पत्रकाराचा 'झोल' वाचून बसेल धक्का

योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा गैरवापर करत बोगस ईमेलवरून स्वतःच्या वर्तमानपत्रासाठी जाहीराती गोळा करणाऱ्या मुक्त पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा गैरवापर करत बोगस ईमेलवरून स्वतःच्या वर्तमानपत्रासाठी जाहीराती गोळा करणाऱ्या मुक्त पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे.

योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा गैरवापर करत बोगस ईमेलवरून स्वतःच्या वर्तमानपत्रासाठी जाहीराती गोळा करणाऱ्या मुक्त पत्रकाराला पोलिसांनी अटक केली आहे.

लखनऊ, 30 जानेवारी: उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh) विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) हे खासदार (MP) असताना त्यांच्या नावाचा गैरवापर करत फसवणूक करणाऱ्या एका मुक्त पत्रकाराला (Freelance journalist) पोलिसांनी अटक केली आहे. आपल्या वृ्तपत्राला जाहीरात (Advertisement for newspaper) मिळावी, यासाठी 2016 साली खासदार असणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्या नावे बोगस ईमेल पाठवून लुबाडणूक केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. योगी आदित्यनाथ हेच जणू आपल्या वर्तमानपत्राला जाहीरात देण्यासाठी शिफारस करत आहेत, असा बनाव त्याने रचला आणि अनेक संस्थांना जाहीराती देण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून आलं आहे.

असं रचलं कुभांड

ही घटना आहे 2016 सालची. उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्या काळी लोकसभेचे खासदार होते. फ्री लान्स पत्रकार मनोज कुमार सेठ याने योगी आदित्यनाथांच्या नावाचा गैरवापर करून स्वतःच्या वर्तमानपत्रासाठी जाहीरात मिळवण्याचा डावा आखला. त्यासाठी त्याने योगी आदित्यनाथ यांच्या नावे एक बोगस ईमेल तयार केला. yogiadityanath.mp@gmail.com या नावाने विविध संस्थांना ईमेल करून आपल्या संस्थेला जाहीरात देण्याची सूचना त्यावरून केली. मात्र वारंवार हे प्रकार घडू लागल्यामुळे योगी आदित्यनाथ यांच्या सहकाऱ्यांना संशय आला आणि चौकशी सुरू करण्यात आली.

हे वाचा- Amazing! याठिकाणी एखादी वस्तू हरवत नाही आणि चुकून हरवलीच तरी लगेच मिळते परत

असं फुटलं भांडं

खासदार योगी आदित्यनाथ यांच्या बोगस ईमेलचा वापर करून मुक्त पत्रकार मनोज कुमारनं मोठ्या संस्थांना मेल पाठवायला सुरुवात केली. पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, ONGC, GAIL यासारख्या संस्थांनाही त्याने मेल पाठवले आणि जाहीरात देण्याची सूचना केली. योगी आदित्यनाथ यांनी सही केलेले बोगस लेटरहेड अर्जाचाही स्कॅन कॉपीदेखील त्याने सोबत जोडली होती. ज्यावेळी पोलिसांनी ईमेल आयडीचा तपास केला, त्याचवेळी तो बोगस असल्याचं सिद्ध झालं. त्यावरून हा बनावट ईमेल आयडी तयार करण्यामागचा उद्देशही पोलिसांच्या लक्षात आला. हे सर्व ईमेल तयार झालेल्या पीसीचा आयपी ऍड्रेस, ज्या वर्तमानपत्रासाठी जाहीरात मागण्यात आली होती, त्याचा संस्थापक असे सगळे धागेदोरे पत्रकार मनोज कुमार सेठपर्यंत जाऊन ठेपत असल्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पत्रकार मनोजने आपला गुन्हा कबूल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Advertisement, Crime, Journalist, Uttar pardesh, Yogi Aadityanath