नवी दिल्ली 20 फेब्रुवारी : डॉक्टरांना देवाचा दर्जा दिला जातो. मात्र काही वेळा काही डॉक्टर फक्त आपल्या कामासोबतच नाही तर माणुसकीसोबतही अन्याय करतात. ते असं काही करतात की कदाचित यासाठी कोणी त्यांना माफही करू शकत नाही. विशेषतः ते तर अजिबातही माफ करू शकत नाहीत ज्यांनी डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे जवळची व्यक्ती गमावली आहे.
आधी तोंडात बोळा कोंबला मग हातपाय बांधून जिवंत जाळलं; सुनेसोबत क्रूरतेचा कळस
अशाच एका घटनेत एका प्लास्टिक सर्जनच्या हलगर्जीपणामुळे एका 18 वर्षाच्या मुलीने आपला जीव गमावला (Girl Died During Plastic Surgery). डॉ जेफ्री किम त्यावेळी एम्मालिन गुयेन हिची सर्जरी करत होते. मात्र ऑपरेशन टेबलवरच तिला कार्डिएक अरेस्ट (Cardiac Arrest) आला. याबद्दल डॉक्टरांच्या टीमलाही समजलं मात्र त्यांनी रुग्णवाहिकाही बोलावली नाही आणि सर्जरीही थांबवली नाही. याचा परिणाम म्हणजे तरुणीला आपला जीव गमवावा लागला.
नर्स ऍनेस्थेटिस्ट रेक्स मीकर यांनी भूल दिल्याने 1 ऑगस्ट 2019 रोजी एम्मालिन गुयेन हिला हृदयविकाराचा झटका आला. त्यादरम्यान गुयेन हिला ब्रेन डेड घोषित करण्यात आलं. त्यानंतर तब्बल 14 महिने झुंज दिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर कुटुंबीय अतिशय दुःखात आहेत. तिच्या पालकांच्या मते, त्यांच्या मुलीच्या जीवापेक्षा कोणतीही भरपाई मोठी असू शकत नाही. तपासानंतर या प्रकरणात डॉ किमला दोषी ठरवत अटक करण्यात आली आहे. त्यांचे टीम मेंबर्सही संशयाच्या घेरात आहेत.
सेल्फीच्या वेडापायी डॅममध्ये उतरले 3 मित्र; अचानक पाणी वाढल्याने भयंकर अवस्था...
एम्मालिन गुयेन प्लॅस्टिक सर्जनकडे Botched breast augmentation करण्यासाठी गेली होती. तिला हृदयविकाराचा झटका आला तेव्हा ती ऑपरेशन टेबलवर होती. पण खेदाची गोष्ट म्हणजे प्लास्टिक सर्जनने ना रुग्णवाहिका बोलावली ना तिला वाचवण्याचा दुसरा मार्ग शोधला. कारण हे तर स्पष्ट आहे की प्लास्टिक सर्जन हृदयविकाराचा इलाज करण्यास सक्षम नाही. त्यामुळे तातडीने तिला दुसऱ्या डॉक्टरकडे न्यायला हवं होतं. मात्र डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिचा जीव गेला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Girl death, Surgery