वाढदिवसालाच सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात, 3 पिस्तुलांसह 6 जिवंत राउंड हस्तगत

वाढदिवसालाच सराईत गुन्हेगार पोलिसांच्या ताब्यात, 3 पिस्तुलांसह 6 जिवंत राउंड हस्तगत

सचिन जाधव हा सराईत गुन्हेगार असून सांगली पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

  • Share this:

अनिस शेख, मावळ, 5 जून : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस 24 तास आपलं कर्तव्य बजावत आहेत. एकीकडे महामारी तर दुसरीकडे कायदा सुव्यवस्था अबाधित राखणे अशा दोन्ही जबाबदाऱ्याना पोलीस उत्कृष्टपणे पार पाडत आहेत. अशातच पोलिसांनी सापळा रचत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.

पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस अधिकारी राम गोमारे तसेच कर्मचारी दत्तात्रय बनसूडे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली. तळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-पुणे महामार्गालगत एक व्यक्ती पिस्तूल विक्रीसाठी येणार आहे. त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सोमाटने फाटा या ठिकाणी सापळा लावून एका संशयित तरुणाची विचारपूस केली असता त्याने आपले नाव सचिन जाधव असे सांगितले.

पोलिसांनी या तरुणाची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून एक लाख साठ हजार रूपयांच्या किमतीचे तीन गावठी पिस्तूल, तसेच सहा जिवंत राऊंड आढळून आले आहेत. परराज्यातून विक्रीसाठी त्याने तळेगाव येथे तीन पिस्तूल विक्रीसाठी आणल्याची बाब पोलीस तपासात उघड झाली आहे. सचिन जाधव हा सराईत गुन्हेगार असून सांगली पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा - सरकारी अधिकाऱ्याला थेट चपलेने मारून विचारला जाब! TikTok स्टार भाजप महिला नेत्याचा प्रताप VIDEO

ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी सचिन याचा आज वाढदिवस असल्याने तो धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी त्याने आपल्या जवळील 3 पिस्तूल विक्रीसाठी तळेगाव येथे आणले होते. परंतु पोलिसांना गुन्ह्याची कुणकुण लागताच 3 पिस्तुलसह आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आता त्याचा वाढदिवस पोलिसांच्या विशिष्ट अंदाजात पोलिसी खाक्या दाखवत पोलीस कोठडीत साजरा होणार आहे.

First published: June 5, 2020, 8:08 PM IST

ताज्या बातम्या