गोविंद वाकडे,4 फेब्रुवारी : बाहेरून आलेल्या गुंडांकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे पिंपरी चिंचवड परिसरातील सोसायटी धारकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सोसायटीमध्ये प्रवेश करण्यासाठी वाहनांवर लावण्यात येणारं स्टिकर का लावले नाही? एवढी विचारणा केल्यामुळे झालेल्या वादातून एका सोसायटी धारकाने बाहेरील मित्रांना बोलावून सोसायटीच्या अध्यक्षाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पिंपरी शहरातील दिघी परिसरातील इंदुबन सोसायटीतील अध्यक्षाला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सोसायटीचे चेयरमन जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती आहे. मारहाण आणि तोडफोडीचे दृश्य cctv मध्ये कैद झाले असून त्यानुसार याबाबत सोसायटीच्या सर्व सदस्यांनी मिळून एस.के.मिश्रा नामक व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखले केली आहे.
सोसायटीच्या सर्व सदस्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मारहाण करणाऱ्या तीन संशयितांना दिघी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा - धक्कादायक: उच्चभ्रू सोसायटीत भामटा करता होता लहान मुलांसोबत लैंगिक चाळे
दरम्यान, बाहेरील गुंडांकडून सोसायटीच्या आत घुसून हल्ले केले जाण्याची ही शहरातील दुसरी घटना असून असाच प्रकार या आधीही घडला आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्था महासंघाचे अध्यक्ष सुदेश राजे यांनी याबाबत निषेध व्यक्त करत पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचं सांगितलं आहे. तसंच सर्व सोसायटी धारकांच्या प्रवेशासाठी अनिवार्य नियमावली तयार करणार असल्याचं म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.