Home /News /crime /

Pune Crime News : मैत्रिणीच्या पतीसह त्याच्या मित्रानेही केला तरुणीवर बलात्कार,धमकी देत उकळले पैसे

Pune Crime News : मैत्रिणीच्या पतीसह त्याच्या मित्रानेही केला तरुणीवर बलात्कार,धमकी देत उकळले पैसे

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

Pune crime: पुण्यातील एका 23 वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्या पतीसह त्याच्या मित्रानेही बलात्कार (Physical Abused by Friend Husband) केल्याची बातमी समोर आली आहे.

    पुणे 23 मे : वेगवेगळ्या नातेसंबंधांना काळिमा फासणाऱ्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Crime in Relationship) यातच पुण्यातून आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील एका तरुणीसोबत एक संतापजनक घटना घडली आहे. (Horrible Incident with lady) मैत्रिणीच्या पतीने काय केलं? पुण्यातील एका 23 वर्षीय तरुणीवर मैत्रिणीच्या पतीसह त्याच्या मित्रानेही बलात्कार (Physical Abused by Friend Husband) केल्याची बातमी समोर आली आहे. मैत्रिणीचा पती असल्यामुळे त्याच्यासोबत पीडितेचा संपर्क होता. मात्र, तु मला खूप आवडतेस असा इन्स्टाग्रामवर (Instagram) तिला मेसेज केला. यानंतर तिला फिरायलाही घेऊन गेला आणि यावेळी तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना तिच्यासोबत घडली. इतकेच नव्हे तर बलात्कार करतानाचे तिचे त्यावेळचे फोटो आणि व्हिडिओही काढले. (Physical Abused Photos) तसेच ते व्हायरल करण्याची धमकी देत सतत तिच्यावर अत्याचार केला. आरोपीने तिच्याकडून पैसेदेखील घेतल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर त्याच्या मित्रानेही तिला धमकावत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पैशांची मागणी केली. ही तरुणी खराडी येथील आहे. तिचे वय 23 इतके आहे. तिने चंदननगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली. त्यावरुन आरोपी सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे (वय 22) आणि आशिष विजय कांबळे (वय 23) या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. या 23 वर्षीय तरुणीसोबत हा धक्कादायक प्रकार खराडीतील डब्ल्यूटीसी सेंटर, वाघोलीतील खांदवेनगरमधील कृष्णा लॉज येथे जून 2021 ते 20 मे 2022 या कालावधी दरम्यान घडला. तरुणीसोबत शारिरीक संबंध प्रस्थापित करत काढले नग्न फोटो - आरोपी सिद्धार्थ हा पीडित तरुणीच्या मैत्रिणीचा पती आहे. त्याने आधी इन्टाग्रामवरुन पीडित तरुणीला मेसेज केला. यानंतर मोबाईलवर फोनही केला. तु मला खूप आवडतेस, असं म्हणत तिला कारने वेगवेगळ्या ठिकाणी फिरायलाही नेले. तेथे तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओही काढले आणि हे व्हायरल करतो आणि तुझ्या घरच्यांनाही दाखवतो, असे धमकीही तिला दिली. त्याबदल्यात तिच्याकडून 17 हजार रुपयेही उकळले. हेही वाचा - औरंगाबाद हादरलं..! पती-पत्नीची हत्या; कुजलेल्या अवस्थेत आढळले घरात मृतदेह मित्रानेही साधला डाव - आरोपीने सिद्धार्थने पीडितेसोबत वेळोवेळी बलात्कार केला. यानंतर तिच्यासोबत आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. सिद्धार्थचा मित्र आशिष कांबळेनेही तिला धमकी देऊन तिच्यासोबत बलात्कार केला आणि शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला मारहाणही केली आणि तिच्याकडून पैशाचीही मागणी केली. यामुळे तिच्यासोबत होणाऱ्या या सततच्या छळाला ती कंटाळली आणि तिने चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी सिद्धार्थ मधुकर श्रीखंडे (वय 22) आणि आशिष विजय कांबळे (वय 23) या दोन जणांना अटक करण्यात आली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Physical attraction, Pune crime news, Sexual harassment

    पुढील बातम्या