नोएडा, 6 ऑगस्ट : देशांत दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. आता नोएडा येथून आणखी संतापजनक बातमी समोर आली आहे. आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घडना घडली. याप्रकरमी उत्तर प्रदेश पोलिसांच्या हवालदारासह दोघांना शुक्रवारी रात्री अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन फेज-3 परिसरात असलेल्या हॉटेलच्या खोलीत मुलीचा मृतदेह फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मुलीच्या कुटुंबीयांनी नोएडा येथे तैनात असलेला पोलीस कर्मचारी आकाश आणि मुलीचा सहकारी अर्जुन दुग्गल याच्यासह पाच जणांवर बलात्कार आणि हत्येचा आरोप केला होता. त्यानंतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरिक्त पोलिस उपायुक्त (झोन II) अंकिता शर्मा यांनी सांगितले की, मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना एक व्हिडिओ दिला आहे. त्यात ती तरुणी असे म्हणाली की, नोएडामध्ये तैनात असलेला पोलीस कर्मचारी आकाशने तिचे आयुष्य उध्वस्त केले आहे. तर याप्रकरणी फेज-3 पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी कॉन्स्टेबल आकाश आणि अर्जुन दुग्गल या दोघांना आज अटक केली आहे. व्यवस्थापक आणि ग्राहकानेही केला बलात्कार - दिल्ली-एनसीआरमध्ये सध्या बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वीही दिल्लीच्या पीतमपुरा भागातील स्पामध्ये २२ वर्षीय महिलेवर झालेल्या सामूहिक बलात्कार झाला होता. याप्रकरणी दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलीस आणि MCD यांना नोटीस बजावली आहे. एका 22 वर्षीय तरुणीने दिल्ली महिला आयोगाकडे स्पामध्ये तिच्यासोबत सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दाखल केली होती. हेही वाचा - 28 तास झाडाला लटकलेल्या अवस्थेत साधुचा मृतदेह; भाजप आमदारासह 3 जणांवर गुन्हा दाखल तक्रारदार तरुणीने सांगितले की, त्याने 27 जुलै रोजी दिल्लीतील पीतमपुरा भागातील द ओशन स्पामध्ये मसाजचे काम सुरू केले होते. तिने सांगितले की, 4 ऑगस्ट रोजी स्पा (एसपीए) च्या व्यवस्थापकाने तिची एका ग्राहकाशी ओळख करून दिली आणि नंतर तिला कोल्ड ड्रिंक्समध्ये काही मादक पदार्थ दिले, त्यानंतर व्यवस्थापक आणि ग्राहकाने तिच्यावर बलात्कार केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.