इम्फाळ, 6 ऑक्टोबर : तस्करी (smuggling) करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. परदेशातून बेकायदेशीर वस्तू भारतात आणण्यासाठी तस्कर विविध मार्गांचा अवलंब करताना आपल्याला दिसून येतं. तसंच देशातही एका राज्यातून दुसऱ्या राज्यात तस्करी होते. ड्रग्ज (drugs), सोनं (gold), अफू, गांजा यांच्या तस्करीतून तस्करांना बक्कळ पैसा मिळतो. देशात सोन्याच्या तस्करीचं प्रमाण वाढलं आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी तस्कर (smugglers) नवनवीन क्लृप्त्या शोधत राहतात. सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्कर विविध शक्कल लढवत असतात. तस्करांकडून सोन्याची तस्करी करण्याचा एक नवा प्रकार समोर आला आहे. सोन्याची तस्करी करण्यासाठी तस्करांनी लढवलेली भन्नाट शक्कल पाहून पोलिसांनाही आश्चर्य वाटलं. इम्फाळ विमानतळावर (Imphal airport) एका व्यक्तीला सोन्याची तस्करी करताना अलकीडेच अटक झाली. बेकायदेशीरपणे सोनं घेऊन जाताना या व्यक्तीने जी शक्कल लढवली त्याची बरीच चर्चा होत आहे. मोहम्मद शरीफ असं या तस्कराचं नाव आहे. तो इम्फाळहून दिल्लीला (Delhi) जात होता . विमानतळावरच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना त्याच्या हालचालींवर संशय आला. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन तपासणीसाठी नेलं. त्या वेळी तो खूप घाबरलेला दिसला. सीआयएसएफ आणि कस्टम अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली. त्याच्या कपड्यांमधून आणि वस्तूंमधून त्यांना काहीही सापडलं नाही. यानंतर मोहम्मद शरीफ याचा एक्स-रे काढण्यात आला. एक्स-रेमध्ये जे दिसलं ते थक्क करणारं होतं. त्या व्यक्तीच्या गुदाशयात सुमारे 908 ग्रॅम सोनं होतं. हे सोनं त्याच्या पोटात पेस्टच्या स्वरूपात टाकण्यात आलं होतं. ही पेस्ट चार भागांमध्ये विभागली गेली आणि एक पॅकेट बनवून गुदाशयात लपवलं गेलं. हे ही वाचा- हायप्रोफाईल व्यापाऱ्याने केली आत्महत्या, पत्नीने कापून घेतला स्वतःचा गळा एक्स-रे पाहिल्यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. मोठ्या कष्टाने त्याने त्याच्या गुदाशयात खालून सोन्याची पेस्ट घातल्याचं त्याने सांगितलं. या सोन्याची किंमत 42 लाख रुपये आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला अटक करून पुढील कारवाई सुरू केली. मोहम्मद शरीफ मूळचा केरळमधील कोळीकोडचा आहे. तो इम्फाळहून दिल्लीला सोनं बेकायदेशीरपणे घेऊन जात होता. इम्फाळमध्ये सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणावर केली जाते. काही दिवसांपूर्वी येथे अज्ञात वाहनातून तब्बल 43 किलो सोनं पकडलं होतं. येथून सोने घेऊन तस्कर ते इतर राज्यांमध्ये विकतात. मोहम्मद शरीफच्या माध्यमातून पोलीस त्यांच्या संपूर्ण टोळीचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. मागच्या महिन्यात मुंबई विमानतळावर नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने तीन महिलांना संशयावरून ताब्यात घेतलं. या महिलांनी त्यांच्या शरीरात ५ किलो सोन्याची बिस्किटं लपवली होती. महिलांनी त्यांच्या प्रायव्हेट पार्टमधून सोनं शरीरात टाकलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.