मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आई वडिलांनी सांगितलं अभ्यास कर, तर 12 वीच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

आई वडिलांनी सांगितलं अभ्यास कर, तर 12 वीच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल

ही विद्यार्थिनी सोनीपतच्या ऋषी कुल विद्यापीठ शाळेत इयत्ता 12 वीमध्ये शिक्षण घेत होती.

ही विद्यार्थिनी सोनीपतच्या ऋषी कुल विद्यापीठ शाळेत इयत्ता 12 वीमध्ये शिक्षण घेत होती.

ही विद्यार्थिनी सोनीपतच्या ऋषी कुल विद्यापीठ शाळेत इयत्ता 12 वीमध्ये शिक्षण घेत होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Sonipat, India
  • Published by:  News18 Desk

हरियाणा, 30 ऑगस्ट : देशात आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे, असे दिसत आहे. प्रत्येक आई वडिलांना वाटते की आपल्या मुलांनी शिक्षण घेऊन मोठे व्हावे. मात्र, एका 12 च्या विद्यार्थिनीला तिच्या आई वडिलांना अभ्यास करायला सांगितले. तर त्याने चौथ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. ही घटना हरयाणा राज्यातील सोनीपत जिल्ह्यात घडली.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

सोनीपतमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीने चौथ्या मजल्यावरून उडी मारून मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. तर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन या प्रकरणी तपास सुरू केला. या मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे. तर पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही.

ही विद्यार्थिनी सोनीपतच्या ऋषी कुल विद्यापीठ शाळेत इयत्ता 12 वीमध्ये शिक्षण घेत होती. तिचे नावे चावी असे होते. ती मानसिकरित्या आजारी होती. सोमवारी तिला तिच्या आई वडिलांनी अभ्यास नाही करत म्हणून ओरडले तर तिने चौथ्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. याप्रकरणी सोनीपत सेक्टर 27 पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नरेश कुमार यांनी सांगितले की, ऋषी कुल विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली.

हेही वाचा - Sonali Phogat Murder Case: 12 हजारांच्या ड्रग्जने घेतला सोनालीचा जीव! असा आखला कट

या प्रकरणी तिच्या कुटुंबीयांनी आपली मुलगी मानसिक आजारी असल्याचे सांगितले आहे. तिला अभ्यास करण्यास सांगितले असता तिने आत्महत्येचे पाऊल उचलले. तर शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मृतदेहाजवळ कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट सापडली नाही. या प्रकरणाची पोलीस पुढील तपास करत आहेत.

First published:

Tags: Haryana