मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुणे : घर भाड्याने देण्याची ऑनलाईन जाहिरात पडली महागात, गुगल पे ची लिंक केली क्लिक अन्

पुणे : घर भाड्याने देण्याची ऑनलाईन जाहिरात पडली महागात, गुगल पे ची लिंक केली क्लिक अन्

29 वर्षीय तक्रारदाराने आपल्या फ्लॅटसाठी भाडेकरू हवा आहे, अशा आशयाची ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध केली होती.

29 वर्षीय तक्रारदाराने आपल्या फ्लॅटसाठी भाडेकरू हवा आहे, अशा आशयाची ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध केली होती.

29 वर्षीय तक्रारदाराने आपल्या फ्लॅटसाठी भाडेकरू हवा आहे, अशा आशयाची ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध केली होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  News18 Desk

पुणे, 3 सप्टेंबर : सध्या तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईनच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक झाल्याच्या अनेक घटना घडतात. यातच आता पुण्यातून अशाच प्रकारची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुण्यातील एका घरमालकाची तब्बल 1 लाख 38 हजारात फसवणूक करण्यात आली आहे. भाडेकरू असल्याचे सांगत एका सायबर ठगाने विमाननगर येथील फ्लॅट मालकाला 1.38 लाख रुपयात गंडवले.

आर्मीमध्ये असल्याचे सांगत फसवणूक -

ही घटना 5 जानेवारी 2022 रोजी घडली होती. या घटनेनंतर संबंधित फ्लॅट मालकाने 2 सप्टेंबर रोजी लोहगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 29 वर्षीय तक्रारदाराने आपल्या फ्लॅटसाठी भाडेकरू हवा आहे, अशा आशयाची ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध केली होती. आरोपी महिलेने फ्लॅट मालकाच्या नंबरवर व्हॉट्सअॅप कॉल केला आणि त्याला सांगितले, की आपण आर्मीमध्ये आहोत. तसेच फ्लॅटसाठी आगाऊ पैसे देत असल्याचे म्हणत आरोपीने एक गुगलपेची एक लिंक पाठवली आणि याच माध्यमातून घरमालकाची आर्थिक फसवणूक केली.

त्या महिलेने पाठवलेल्या लिंकवर घरमालकाने क्लिक करत ती लिंक अॅक्सेप्ट केली. मात्र, यानंतर त्याच्या खात्यातून तब्बल 1.38 लाख रुपये डेबिट झाले. यानंतर आपली फसवणूक झाली आहे, असे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतली आणि सर्व पुरावे सायबर पोलिसांकडे सादर केले. तसेच या प्रकरणाच्या तपासासाठी अर्ज दाखल केला होता. दरम्यान, संबंधित आरोपीचे ठिकाण शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.

आरोपी महिला पश्चिम बंगालमधील -

शहर पोलिसांच्या सायबर सेलकडे हा तपास होता. त्यांच्या माध्यमातून या प्रकरणाचा तपशीलवार फॉरेन्सिक तपास केला गेला. हा अहवाल पोलीस ठाण्यात पाठवल्यावर तक्रार दाखल करण्यात आली. पोलिस तपासात आरोपी महिला ही पश्चिम बंगालमधील रहिवासी आहे. तसेच या महिलेचे नाव मल्लिका उज्ज्वल बर्मन असे आहे. तसेच यात तिचे दोन सहकारीही सामील होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

हेही वाचा - पुणे जिल्ह्यात बैलगाडा शर्यतींवर बंदी; वाचा, काय आहे महत्त्वाचं कारण?

सायबर पोलीस स्टेशनचे प्रभारी दगडू हाके यांनी माहिती तंत्रज्ञान कायदा आणि आयपीसी कायद्यांतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. ऑनलाईन पैसे पाठवताना कोणत्याही लिंकची गरज नसते. त्यामुळे मेसेजच्या माध्यमातून किंवा इतर कोणत्याही माध्यमातून आलेली लिंक क्लिक करू नये, असे पोलिसांनी म्हटले आहे.

First published:

Tags: Money fraud, Online fraud, Pune crime news